• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • लग्नासाठी आईला केलं प्रपोज अन् मुलीशी थाटला संसार; डबल गेम करणाऱ्या जावयाचा खेळ खल्लास

लग्नासाठी आईला केलं प्रपोज अन् मुलीशी थाटला संसार; डबल गेम करणाऱ्या जावयाचा खेळ खल्लास

Murder in Mumbai: मुंबईतील वडाळा पूर्व परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एक महिलेनं आपल्या जावयाची हातोड्यानं वार (Attack with hammer) करत निर्घृण हत्या (Mother in law killed son in law) केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर: मुंबईतील (Mumbai) वडाळा पूर्व परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एक महिलेनं आपल्या जावयाची हातोड्यानं वार (Attack with hammer) करत निर्घृण हत्या (Mother in law killed son in law) केली आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 56 वर्षीय जावयाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून पोलीसही हादरून गेले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या सासूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. विमल खन्ना असं हत्या झालेल्या 56 वर्षीय जावयाचं नाव असून ते मुंबईतील वडाळा पूर्व परिसरातील रहिवासी आहेत. तर शांती पाल असं अटकर करण्यात आलेल्या 72 वर्षीय महिलेचं नाव असून ती विरारमधील रहिवासी आहे. आरोपी महिला काही दिवसांपूर्वी आपला जावई विमल खन्ना यांच्याकडे राहण्यासाठी आली होती. दरम्यान, दोघांमधील जुना वाद उफळल्यानं 72 वर्षीय महिलेनं आपल्या जावयाची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी महिलेला अटक केली आहे. हेही वाचा-खाल्लं-प्यायलं आणि उलटले; नेत्यांनी पैसे बुडवल्याने व्यावसायिकाची आत्महत्या नेमकं प्रकरण काय आहे? 56 वर्षीय मृत विमल खन्ना यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या वयापेक्षा 16 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शांती पाल यांना लग्नासाठी मागणी घातली होती. पण खन्ना यांनी पाल यांच्याशी लग्न न करता त्यांच्या मुलीशी लग्न केलं. त्यामुळे विमल खन्ना आणि शांती पाल यांच्यात वाद सुरू होता. एकेकाळी लग्नासाठी मागणी घालणारा मुलगाच आपला जावई बनल्यानं शांती पाल यांना विमल खन्ना यांच्यावर राग होता. यातून दोघांमध्ये अनेकदा भांडणं देखील झाली होती. हेही वाचा-अभ्यासासाठी दुसऱ्या मजल्यावर गेली अन्...; बंद खोलीत मुलीचं धक्कादायक कृत्य पण काही दिवसांपूर्वी 72 वर्षीय शांती पाल आपला जावई खन्ना यांच्याकडे वडाळा याठिकाणी आल्या होत्या. दरम्यान मंगळवारी दोघांमधील जुना वाद पुन्हा उफाळून निघाला. याच रागातून 72 वर्षीय सासूबाई शांती पाल यांनी विमल खन्ना यांच्या डोक्यात हातोड्याने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी आरोपी सासूबाई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वडाळा पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: