पुणे, 27 सप्टेंबर: पुण्यातील (Pune) एका विवाहित तरुणीला अमेरिकेत (America) नेत तिचा अमानुष छळ (Inhuman persecution) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पत्नीने फिर्यादी तरुणीला अमेरिकेत नेऊन तिला मानसिक त्रास देत क्रूर वागणूक दिली आहे. तसेच लग्नात मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंचा अपहार करत संयुक्त खात्यातील तब्बल 48 लाख 62 हजार रुपये (Rs 48 lakh fraud) परस्पर काढून घेतले आहेत. याप्रकरणी भारतात आल्यानंतर आरोपी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास वारजे पोलीस करत आहे. प्रियाल पालकर असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी पतीचं नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेनं वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपी प्रियाल याने 25 सप्टेंबर 2014 पासून 2020 पर्यंत फिर्यादीचा छळ केला आहे. आरोपी प्रियाल आणि फिर्यादीचा 2014 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर दोघंही अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे नोकरीला गेले. हेही वाचा- नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या अन्…; नवविवाहितेचा कारनामा जाणून चक्रावून जाल पण याठिकाणी गेल्यानंतर काही दिवसांतच आरोपीनं आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. दोघंचंही बँकेत संयुक्त खातं होतं. याचा फायदा घेत पतीने पीडितेच्या खात्यातील 74 हजार 801 अमेरिकन डॉलर (48 लाख 62 हजार रुपये) परस्पर काढून घेत तिची फसवणूक केली आहे. तसेच आरोपीने शिवीगाळ करत तिला मारहाण केल्याचा देखील आरोप पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत केला आहे. हेही वाचा- धक्कादायक! बायकोच्या नाकाला चावा घेत पाडला तुकडा; कारण ऐकून पोलिसही चक्रावले आरोपी पत्नीच्या अमानुष छळाला कंटाळून फिर्यादी महिला अमेरिकेहून भारतात परत आल्या आहेत. याठिकाणी आल्यानंतर त्यांनी आरोपी पतीसह तीन जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. वारजे पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचार, मारहाण आणि आर्थिक फसवणूक अशा विविध कलामाअंतर्गत गुन्हा दाखल केली आहे. फिर्यादी विवाहितेचं ठाणे हे सासर आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.