Home /News /national /

धक्कादायक! बायकोच्या नाकाला चावा घेत पाडला तुकडा; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

धक्कादायक! बायकोच्या नाकाला चावा घेत पाडला तुकडा; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

विविध कारणांतून नवऱ्याने बायकोला किंवा बायकोनं नवऱ्याला मारहाण (husband wife hassle) केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण नवऱ्याने संतापाच्या भरात आपल्या बायकोचं नाक तोडल्याची एक विचित्र घटना उघडकीस आली आहे.

    रतलाम, 26 सप्टेंबर: विविध कारणांतून नवऱ्याने बायकोला किंवा बायकोनं नवऱ्याला मारहाण (husband wife hassle) केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण नवऱ्याने संतापाच्या भरात आपल्या बायकोचं नाक तोडल्याची एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. बायकोसोबत वाद झाल्यानंतर नवऱ्याने तिच्या नाकाचा जबरी चावा (husband bite wife's nose) घेत पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी  गुन्हा दाखल (FIR Lodged) केला असून आरोपी नवऱ्याला अटक (Accused husband arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. संबंधित घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील आहे. तर टीना माली असं पीडित महिलेच नाव असून आरोपी पती दिनेश मालीला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी टीना आणि आरोपी दिनेश यांचं 2008 साली लग्न झालं होतं. लग्नानंतर दिनेशने काही दिवसांतच आपला खरा रंग दाखवला सुरुवात केली. तो काहीच काम करत नव्हता. शिवाय दारू पिऊन सतत फिर्यादीला टीनाला शिवीगाळ आणि मारहाण करू लागला होता. हेही वाचा-डोंगराच्या पायथ्याशी आढळला मृतदेह; दारुची बाटली अन् गुलाबात दडलंय मृत्यूचं गूढ त्यामुळे आरोपीच्या रोजच्या छळाला कंटाळून अखेर टीना आपल्या मुलींना घेऊन माहेरी राहू लागल्या. याठिकाणी त्या खानावळीत काम करून आपल्या मुलीचं पालनपोषण करू लागल्या होता. दरम्यान टीना यांनी 2019 कोर्टात दावा दाखल करत मुलींच्या पालनपोषणासाठी पोडगीची मागणी केली होती. ही बाब आरोपी दिनेशला कळाली. त्यामुळे त्याने संबंधित खटला मागे घेण्यासाठी दबाव बनवला. पण फिर्यादीने खटला मागे घेण्यास नकार दिला. हेही वाचा-बलात्कार पीडितेनं YouTube Video पाहून केला स्वत:चा गर्भपात; तरुणीची भयंकर अवस्था त्यामुळे संतापलेल्या दिनेशने रागाच्या फिर्यादीचं घर गाठलं. याठिकाणी आरोपीनं टीना त्यांच्या मुलींना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने अचानक फिर्यादीच्या नाकाचा चावा घेतला. आरोपीनं घेतलेल्या चाव्यामुळे फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. पत्नीला मारहाण केल्यानंतर आरोपी दिनेश घटनास्थळावरून फरार झाला. यावेळी फिर्यादी टीना शेजारच्यांच्या मदतीने रुग्णालयात गेल्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पती दिनेशला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh

    पुढील बातम्या