Home /News /crime /

नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या अन्...; नवविवाहितेचा कारनामा जाणून चक्रावून जाल

नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या अन्...; नवविवाहितेचा कारनामा जाणून चक्रावून जाल

या घटनेत सुरेश कुमार नावाच्या व्यक्तीनं दलालांच्या जाळ्यात फसत छत्तीसगडच्या एका महिलेसोबत कोर्टात जात लग्न केलं. ही महिला त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती

    नवी दिल्ली 26 सप्टेंबर : हरियाणामध्ये (Haryana) इतर राज्यांमधून नवरी आणण्याची प्रकरणं काही नवी नाहीत. इथे दुसऱ्या राज्यांमधून लग्न (Marriage) करून नवरी घेऊन यायची आणि त्यांची माध्यमातून लूट करायची, अशी प्रकरणं वाढतच आहेत. याआधीही या राज्यातून अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यात काही टोळ्या दुसऱ्या राज्यांमधून नवरी घेऊन येत तरुणांना आपलं शिकार बनवतात. हे तरुण टोळीच्या सापळ्यात अडकतात आणि या दुसऱ्या राज्यातील महिलांसोबत लग्न करतात. मात्र, काहीच दिवसात या नवऱ्या घरातून पळ काढतात आणि पैसे तसंच दागिने लुटतात (Bride Flees With Jewellery). डोंगराच्या पायथ्याशी आढळला मृतदेह; दारुची बाटली अन् गुलाबात दडलंय मृत्यूचं गूढ अशीच एक घटना आता रोहतकमधून समोर आली आहे. या घटनेत सुरेश कुमार नावाच्या व्यक्तीनं दलालांच्या जाळ्यात फसत छत्तीसगडच्या एका महिलेसोबत कोर्टात जात लग्न केलं. ही महिला त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती. लग्नासाठी त्यानं दलाला 70 हजार रुपये दिले होते. लग्नानंतर ही महिला कुटुंबीयांसोबत इतकी आनंदात आणि मिळून मिसळून राहात होती की त्यांनाही तिच्यावर विश्वास बसला. मात्र, काही दिवसातच ती नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांना झोपेच्या गोळ्या देऊन पैसे आणि दागिन्यांसह फरार झाली. पोलीस याप्रकरणी महिलेचा शोध घेण्यात या युवकाची मदत करत आहेत. हा युवक जेव्हा आपली तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचला तेव्हा पोलिसांनी म्हटलं, की एक दोन दिवस वाट पाहा. ती परत येईल. या व्यक्तीनं सांगितलं, की त्यानं आपल्या आईच्या ऑपरेशनसाठी 70 हजार जमवले होते आणि तिच्यासाठी काही दागिनेही बनवले होते. मात्र, हीच लुटेरी नवरी दागिने आणि पैसे घेऊन फरार झाल्यानं युवकाच्या कुटुंबीयांना धक्का बसला. खरी ओळख लपवत पत्नीने शरीरसंबंधास दिला नकार; 3 महिन्यांनी फुटलं बिंग पीडित सुरेश कुमारनं सांगितलं, की त्यानं तीन महिन्यापूर्वी छत्तीसगडच्या आरती नावाच्या युवतीसोबत कोर्ट मॅरेज केलं. ती त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती. लग्नासाठी त्यानं दलालाला 70 हजार रुपये दिले होते. मात्र, लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरकडच्यांना झोपेच्या गोळ्या देऊन नवरी फरार झाली. युवकानं आईच्या ऑपरेशनसाठी ठेवलेले पैसेही ती घेऊन गेली. आता या महिलेनं परत यावं अशी या युवकाची इच्छा आहे. माझ्यासोबत राहा किंवा कोर्टात जात मला घटस्फोट तरी दे अशी मागणी त्याची आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bride, Crime news

    पुढील बातम्या