पिंपरी-चिंचवड, 16 ऑगस्ट: पुण्याजवळील चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित प्रियकरानं लग्नाला नकार (Married boyfriend refused to marriage) दिल्यानं प्रेयसीनं सूड उगवला आहे. आरोपी प्रेयसीनं प्रियकराला चिंचवड परिसरातील एका लॉजवर बोलवून कायमचा विषय संपवला आहे. रात्री दहाच्या सुमारास लॉजमधील रुममध्ये मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी तरुणीला गजाआड केलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पैगंबर गुलाब मुजावर असं हत्या झालेल्या विवाहित प्रियकराचं नाव आहे. मृत पैगंबर आणि आरोपी तरुणी एकाच ठिकाणी कामाला होते. त्यामुळे दोघांत अनेकदा बोलणं व्हायचं. यातूनच वर्षभरापूर्वी पैगंबर याचं आरोपी तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. काहीकाळ त्याचं नातं व्यवस्थित चालल्यानंतर मृत पैगंबर आरोपी तरुणीला भेटायला जात नव्हता. दरम्यान तिने पैंगबरकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे मृत पैंगबरनं लग्नाला नकार दिला.
हेही वाचा-नाकातोंडात मिरची पूड टाकून महिलेनं आवळला वृद्धाचा गळा; मुंबईतील धक्कादायक घटना
हा राग मनात धरून आरोपी प्रेयसीनं पैंगबरच्या हत्येचा कट रचला. दोन दिवसांपूर्वी प्रेयसीनं पैगंबरला चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरातील व्हाईट हाऊस लॉजमध्ये भेटायला बोलावलं. पैगंबरही नेहमीप्रमाणे तिला लॉजवर भेटायला गेला. पण आरोपी तरुणीचा इरादा मात्र वेगळाच होता. पैगंबर लॉजमध्ये आल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी तरुणीनं अचानक पैगंबरच्या गळ्याभोवती ओढणीचा फास टाकला आणि तो घट्ट आवळला. यातच पैगंबरचा मृत्यू झाला.
हेही वाचा-VIDEO : 'अरे इसकी गर्दन काट..';मुंबईत रस्त्यात 9 जणांचा दोघांवर तलवारीने हल्ला
यानंतर रात्री दहाच्या सुमारास तिने पैगंबर बेशुद्ध पडल्याचं लॉजमधील कर्मचाऱ्यांना सांगितलं. लॉजमधील कर्मचाऱ्यांनी पैगंबरला तातडीने पुण्यातील वायसीएम रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी 29 वर्षीय आरोपी प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Pune