मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नाकातोंडात मिरची पूड टाकून महिलेनं आवळला वृद्धाचा गळा; मुंबईतील धक्कादायक घटना

नाकातोंडात मिरची पूड टाकून महिलेनं आवळला वृद्धाचा गळा; मुंबईतील धक्कादायक घटना

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

Murder in New Panvel: आरोपींनी वृद्ध व्यक्तीचे हात पाय बांधून, नाकातोंडात मिरची पूड टाकून गळा आवळून हत्या (tied limbs And murder by strangulation) केली आहे.

मुंबई, 16 ऑगस्ट: मुंबईनजीक (Mumbai) असणाऱ्या नवीन पनवेल (New Panvel) परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील ओवळे परिसरात राहणाऱ्या 60 वर्षांच्या वयोवृद्धाची निर्घृण हत्या (Brutal murder of elderly man)  करण्यात आली आहे. आरोपींनी वृद्ध व्यक्तीचे हात पाय बांधून, नाकातोंडात मिरची पूड टाकून गळा आवळून हत्या (tied limbs And murder by strangulation) केली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत बुलडाण्यातून मुख्य आरोपी महिलेसह एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बाळाराम चंदर पाटील असं हत्या झालेल्या 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. मृत पाटील हे नवीन पनवेल परिसरातील ओवाळे परिसरात वास्तव्याला आहेत. दरम्यान एका महिलेनं आपल्या एका पुरुष साथीदाराच्या मदतीनं बाळाराम पाटील यांची  निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी पाटील यांचे हातपाय बांधत, त्यांच्या नाकातोंडात मिरचीपूड टाकून गळा आवळून हत्या केली आहे. यानंतर आरोपींनी घरातील 20 तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा-मुंबई: वंशाच्या दिव्यासाठी न्यायाधीशाच्या मुलीचा अमानुष छळ; 8 वेळा केला गर्भपात

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून 17 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं एक पथक तातडीनं बुलडाणा येथे रवाना झालं होतं. पण आरोपी महिला बुलडाणा ते नवी मुंबई असा प्रवास करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांच्या पनवेल शहर पोलिसांच्या डीबी पथकानं आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा-अचानक साप दिसला अन् काळजाचा ठोका चुकला; नगरमध्ये कड्यावरून कोसळून मुलाचा मृत्यू

आरोपी महिलेकडे चौकशी केली असता, तिने हा गुन्हा आपला पुरूष साथीदार मंगेश खेत्री याच्या मदतीनं केल्याची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे बुलडाण्यात गेलेल्या पोलीस पथकानं आरोपी मंगेशला बुलडाण्यातून अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून 17 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. संपूर्ण मुंबईला हादरून सोडणाऱ्या या संवेदनशील गुन्हाचा अवघ्या 24 तासांत पोलिसांनी उलगडा केला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mumbai, Murder