मुंबई, 16 ऑगस्ट : मुंबई, पुण्यासारख्या (Mumbai Crime News) शहरांमध्येही भररस्त्यात होणाऱ्या गुन्हेगारी चिंता वाढवणारी आहे. पुण्यातून तर वारंवार अशा घटना समोर येत आहे. रस्त्यांमध्ये हत्येसारखे गुन्हे घडायला लागले तर सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उभं राहत आहेत. अशातच मुंबईतील गोरेगाव भागातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये 9 जणांची टोळी 2 तरुणांवर हल्ला करीत असताना दिसत आहे. (Mumbai Shocking Video)
हा सर्व प्रकार सुरू असताना कोणीतरी लपून मोबाइलमधून हे दृश्य शूट करीत असल्याची शक्यता आहे. मुंबईतील गोरेगाव भागात 9 जणांची टोळी 2 तरुणांवर तलवार, हॉकी आणि चाकूने हल्ला करीत होते. या घटनेत दोघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दिंडोशी पोलिसांनी या प्रकरणात 9 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात दिंडोशी पोलिसांनी आयपीसी कलम 307 अंतर्गत 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील गोरेगाव भागातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये 9 जणांची टोळी 2 तरुणांवर तलवारीने हल्ला करीत असताना दिसत आहे. pic.twitter.com/mh62luL0sy
— News18Lokmat (@News18lokmat) August 16, 2021
हे ही वाचा-आजोबांकडून घृणास्पद कृत्य, मदतीसाठी काकाकडे गेली त्यानेही केलं शोषण, मग भावानेही
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 5 दिवसांपूर्वी घडली होती आणि या दोन्ही गटांमध्ये जुना वाद आहे. आरोपी आणि पीडितांमध्ये 2017 मध्ये वाद झाला होता. ज्यात पीडित तरुणाने अत्यंत वाईट प्रकारे मारहाण केली होती. त्याचा सूड उगविण्यासाठी या 9 जणांनी एकत्र येत त्या तरुणावर हल्ला केला व त्यापैकी एकाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gang murder, Mumbai, Shocking video viral