मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

रक्षाबंधनासाठी बायकोला माहेरी घेऊन गेला अन् परतलाच नाही; पूर्व प्रियकरानं सिनेस्टाइलनं काढला काटा

रक्षाबंधनासाठी बायकोला माहेरी घेऊन गेला अन् परतलाच नाही; पूर्व प्रियकरानं सिनेस्टाइलनं काढला काटा

रक्षाबंधनासाठी (Rakshabandhan)आपल्या बायकोला माहेरी गेलेल्या एका तरुणासोबत विचित्र घटना घडली आहे. प्रेमात अडसर ठरत असल्यानं बायकोच्या जुन्या प्रियकारानं संबंधित व्यक्तीची निर्घृण हत्या (Man killed Girlfriend's Husband) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

भिगवन, 28 ऑगस्ट: रक्षाबंधनासाठी (Rakshabandhan)आपल्या बायकोला माहेरी गेलेल्या एका तरुणासोबत विचित्र घटना घडली आहे. प्रेमात अडसर ठरत असल्यानं बायकोच्या जुन्या प्रियकारानं संबंधित व्यक्तीची निर्घृण हत्या (Man killed Girlfriend's Husband) केली आहे. या घटनेची माहिती मिळताच अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या चुलत भावाला अटक (Police arrest 2) करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, दोघांनाही न्यायालयानं सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

महेश दत्तात्रय चव्हाण (Mahesh Chavhan murder) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते रक्षाबंधनानिमित्त आपल्या बायकोला घेऊन सासुरवाडीला म्हणजेच अकोले येथे आले होते. पण रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी 23 ऑगस्ट रोजी महेश यांची भालदवाडी-अकोले गावच्या शिवारात धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना उघडकीस येताच भिगवन पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण ही हत्या नेमकी कोणी केली याबाबत कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती.  पण पोलिसांनी स्थानिक सूत्रधारांच्या मदतीनं तपास करत मुख्य मारेकऱ्यांचा गजाआड केलं आहे.

हेही वाचा-...म्हणून बहिणीच्या प्रियकराचा केला खेळ खल्लास; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

असं फुटलं बिंग

मृत महेश यांच्या पत्नीचं माहेरी घराशेजारी राहणाऱ्या अनिकेत शिंदे नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते, याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्यानं उडवा उडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं तोंड उघडलं आहे.

हेही वाचा- सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं; 25 वर्षीय तरुणीसोबत चौघांचं घृणास्पद कृत्य

पोलीस चौकशीत अनिकेतनं मृत महेश यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच महेशमुळे प्रेयसीला भेटता येत नव्हतं. त्यामुळे महेशबाबत अनिकेतच्या मनात प्रचंड राग होता. दरम्यान महेश सासुरवाडीला येणार असल्याची माहिती मिळाली. या आलेल्या संधीचा फायदा उचलत आरोपी अनिकेत शिंदे यानं आपला चुलत भाऊ गणेश शिंदे याच्या मदतीनं महेशचा काटा काढला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Murder, Pune