मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...म्हणून बहिणीच्या प्रियकराचा केला खेळ खल्लास; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

...म्हणून बहिणीच्या प्रियकराचा केला खेळ खल्लास; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

अमरावतीतील एका तरुणानं आपल्या बहिणीच्या प्रियकराची निर्घृण (Brother Killed Sister's Boyfriend) हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

अमरावती, 28 ऑगस्ट: प्रेमप्रकरणातून (Love Affair) अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून अमरावतीतील एका भावानं प्रियकर तरुणाची निर्घृण (Brother Killed Sister's Boyfriend) हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी भावानं आपल्या दोन अल्पवयीन मित्रांच्या मदतीनं बहिणीच्या प्रियकराला दुचाकीनं भिवापूर मार्गावर नेत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर चाकूनं सपासप वार (Attack with Knife) केले आहेत. याप्रकरणी कुऱ्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

अक्षय ऊर्फ गुणवंत दिलीप अमदुरे असं हत्या झालेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो चांदूर रेल्वे तालुक्यातील खडकपूरा येथील रहिवासी आहे. मृत अक्षयचं मागील काही दिवसांपासून जवळच्याच एका गावातील मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. या प्रेमप्रकरणातून अक्षयनं संबंधित मुलीला पळवून नेलं होतं. पण पोलिसांनी पळून गेलेल्या दोघांना पकडलं होतं. यावेळी मुलीनं आम्ही स्वखुशीनं पळून गेल्याचं पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी मृत अक्षयवर गुन्हाही दाखल झाला होता.

हेही वाचा-तू गट्ट्या आव्हाळेला नडतो काय? विचारत तरुणावर कोयत्यानं केले वार; पुण्यातील घटना

पण आपल्या अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याचा राग आरोपी भावाच्या मनात होता. मृत अक्षयला मारहाण करण्यासाठी तो संधीच शोधत होता. दरम्यान, मृत अक्षय गुरुवारी आमला विश्वेश्वर परिसरात आला होता. तेव्हा मुलीच्या भावानं त्याला पाहिलं. यानंतर आरोपीनं आपल्या दोन अल्पवयीन मित्रांच्या मदतीनं अक्षयला मारहाण करत त्याला दुचाकीवर बसवलं. यानंतर त्याला भिवापूर मार्गावर नेत लाथा बुक्क्यांनी प्रचंड मारहाण केली.

हेही वाचा-मुंबई हादरली! घरगुती उपचाराच्या नावाखाली 2महिने अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना

पण एवढ्यावरच मुलीच्या भावाचा राग शांत झाला नाही म्हणून त्यानं धारदार चाकूनं अक्षयवर सपासप वार केले. यानंतर त्याला पुन्हा आमला विश्वेश्वर गावात नेऊन भरचौकात मारहाण केली. या घटनेनंतर स्थानिकांनी अक्षयला तातडीनं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण अक्षयची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला नागपूरला हलवण्यात आलं. पण नागपूरला जाताना वाटेतचं अक्षयनं अखेरचा श्वास घेतला आहे. शुक्रवारी त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले आहे. अक्षय हा उत्तम कबड्डीपटू असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडीनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास कुऱ्हा पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Amravati, Crime news, Murder