• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं; 25 वर्षीय तरुणीसोबत चौघांचं घृणास्पद कृत्य

सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं; 25 वर्षीय तरुणीसोबत चौघांचं घृणास्पद कृत्य

पुण्यातील दत्तवाडी परिसरात एका 25 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आाला आहे.

पुण्यातील दत्तवाडी परिसरात एका 25 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आाला आहे.

Gang Rape in Pune: पुण्यातील दत्तवाडी परिसरात एका 25 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:
पुणे, 28 ऑगस्ट: पुण्यातील दत्तवाडी परिसरात एका 25 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang rape in pune) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी पीडितेला घरी घेऊन जात असल्याचं खोटं सांगत पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या (4 Accused Arrest) आहेत. याप्रकरणी पोलीस आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. संबंधित घटना पुण्यातील जनता वसाहत परिसरात घडली आहे. 25 वर्षीय पीडित मुलगी काल सायंकाळी स्वारगेटवरून कात्रजला आपल्या घरी चालली होती. यावेळी आरोपीनं 'तुला घरी सोडतो' असं खोटं सांगून पीडितेला जनता वसाहतीत नेण्यात आलं. याठिकाणी चार जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आहे. श्रीकांत सरोदे, आदित्य पवार, दुर्वेश जाधव आणि आशिष उर्फ राड्या मोहिते असे अत्याचार करणाऱ्या चार नराधमांची नावं आहेत. हेही वाचा-मुंबई हादरली! घरगुती उपचाराच्या नावाखाली 2महिने अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 वर्षीय पीडित तरुणी मतिमंद आहे. काल सायंकाळी पाचच्या सुमारास ती स्वारगेटवरून आपल्या घरी कात्रजला जात होती. दरम्यान आरोपींची तिच्यावर नजर पडली. पीडित तरुणी मतिमंद असल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपीनं तिला 'घरी सोडतो' असं खोटं सांगितलं. तरुणीनंही नराधमांवर विश्वास ठेवला. पण आरोपींना तिला कात्रजला घेऊन जाण्याऐवजी आपल्या घरी जनता वसाहत परिसरात नेलं. हेही वाचा-...म्हणून बहिणीच्या प्रियकराचा केला खेळ खल्लास; महाराष्ट्राला हादरवणारी घटना याठिकाणी नराधमांनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला आहे. या घटनेची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.
Published by:News18 Desk
First published: