मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

राज ठाकरेंच्या अडचणी संपेनात, पुण्याच्या सभेत आणखी एक ख्वाडा?

राज ठाकरेंच्या अडचणी संपेनात, पुण्याच्या सभेत आणखी एक ख्वाडा?

पुण्यादेखील आज राजगर्जना होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभेच्या प्रचाराचा नारळ पुण्यातून फोडणार आहेत. पण...!

पुण्यादेखील आज राजगर्जना होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभेच्या प्रचाराचा नारळ पुण्यातून फोडणार आहेत. पण...!

पुण्यादेखील आज राजगर्जना होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभेच्या प्रचाराचा नारळ पुण्यातून फोडणार आहेत. पण...!

  • Published by:  Renuka Dhaybar
अद्वैत मेहता, प्रतिनिधी पुणे, 09 ऑक्टोबर : सध्या राज्यात निवडणुकांचं वार वाहत आहे. प्रत्येक पक्षात आता प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. पुण्यादेखील आज राजगर्जना होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभेच्या प्रचाराचा नारळ पुण्यातून फोडणार आहेत. त्यामुळे आजच्या प्रचारसभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मनसेचे एकमेव स्टार प्रचारक मुलुख मैदानी तोफेला सरस्वती मंदिर शाळेचे मैदान मिळालं खरं पण परतीच्या पावसाचं सावट सभेवर असेल अशी चर्चा आहे. कसबा गणपतीचं दर्शन घेऊन राज ठाकरे संध्याकाळी भाषण करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुण्यात कसब्यातून मनसेचे अजय शिंदे यांनी भाजपच्या मुक्ता टिळक यांना आव्हान दिलं आहे. इथं शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली आहे तर काँग्रेसचे अरविंद शिंदे देखील मैदानात आहेत. गिरीश बापट खासदार होऊन दिल्लीत गेले आता महापौर मुक्ता टिळक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपसाठी कसब्याची लढत प्रतिष्ठेची असणार आहे. कसबा मतदार संघातून राज यांची तोफ धडाडेल तर कोथरुडमधून मनसेचे किशोर शिंदे आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांची एकास एक लढत होणार आहे. इथं काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला पाठिंबा दिला आहे. यामुळे राज यांच्या रडारवर चंद्रकांत पाटीलही असणार आहेत. पुण्यात ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होती. त्यात जर दोन ठाकरे आमने-सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टीपेला पोहचते. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. इतर बातम्या- असा आहे मान्सूनच्या परतीचा मार्ग, मुंबईसह या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस! दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका मनसे स्वतंत्रपणे लढवत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा मनसेला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं आहे. मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक काही ठिकाणी आपल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली तर काही ठिकाणी त्यांनी उमेदवारच उभे केले नाहीत. ठाणे शहर आणि कल्याण ग्रामीण या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार मागे घेतल्याने आता मनसे विरुद्ध भाजप किंवा शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी आणि मनसेची ही खेळी आता किती रंगत आणणार हे निवडणुकीत दिसणार आहे. ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनाच भाजपने तिकीट दिलंय. तिथे राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांनी माघार घेतलीय त्यामुळे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. इतर बातम्या - JNUमध्ये मुलांच्या हॉस्टेलवर जाण्यास मुलींना बंदी, 'ड्रेस कोड'ही येणार आता या मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे असा थेट सामना होणार आहे. भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मनसेचाही थोडा जोर आहे. भाजपला फायदा मिळू नये यासाठी राष्ट्रवादी मनसेच्या मदतीला धावून गेलीय. राष्ट्रवादीचा तोच पॅटर्न कल्याण ग्रामीणमध्येही बघायला मिळाला. या मतदार संघात राष्ट्रवादीने आपला उमेदवारच उभा केलेला नाही. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असून शिवसेनेकडून रमेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलंय तर मनसेकडून राजू पाटील यांना उमेदवारी मिळालीय. त्यामुळे आता मनसे विरुद्ध शिवसेना असा थेट सामना या ठिकाणी होणार आहे. मनसे करता मागे घेतल्याची  कबूली या नेत्यांनी खासगीत बोलताना दिलीय. इतर बातम्या - VIDEO: वरातीत तरुणाने फटाके नाही तर पिस्तुलाने केला हवेत गोळीबार
First published:

Tags: Chief raj thackeray, Kasba Peth s13a215, Kothrud s13a210, Maharashtra Assembly Election 2019, MNS, Pune news

पुढील बातम्या