JNUमध्ये मुलांच्या हॉस्टेलवर जाण्यास मुलींना बंदी, 'ड्रेस कोड'ही येणार

JNUमध्ये मुलांच्या हॉस्टेलवर जाण्यास मुलींना बंदी, 'ड्रेस कोड'ही येणार

बेबंदशाही आणि स्वैराचाराला आळा घालण्यासाठी काही नियम आवश्यक असल्याचं प्रशासनाचं मत आहे. शिस्त लावण्यासाठी अशा नियमांची गरज असून हे नियम कुठलेही जाचक नियम नाहीत असंही प्रशासनाने म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 09 ऑक्टोंबर : राजधानी दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी JNU आणि वाद हे समिकरण हे काही नवं नाही. आता नवा वाद निर्माण झाला असून प्रशासन लागू करणार असलेल्या नव्या नियमांना विद्यार्थ्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतलाय. मोकळेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र ही JNUची ओळख आहे. त्यामुळे मुला मुलींवर कुठलेही बंधनं घालू देणार नाह अशी विद्यार्थी संघटनांची भूमिका आहे. नव्य नयमांनुसार मुलींना रात्री 10 नंतर मुलांच्या हॉस्टेलमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलीय. तर मुलींसाठी नवा ड्रेसकोडली लागू करण्यात येणार आहे. या नव्या नियमावलीचं काम सुरू असून त्याचा पहिला ड्राफ्ट तयार करण्यात आलाय. मुलींना आता रात्री साडे अकराच्या आतच प्रवेश दिला जाणार असून रात्री उशीरा प्रवेशास आणि बाहेर जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

जे सुडाचं राजकारण करतील त्यांना चिरडून टाकू - उद्धव ठाकरे

त्याचबरोबर परिसरात वावरताना आणि कॅन्टिनमध्ये कुठले कपडे घालावे यासाठीही नियमावली केली जाणार आहे.सध्या मुलांना किंवा मुलींना एकमेकांच्या हॉस्टेलवर जाण्यास कुठलीही आडकाठी नाही. त्याचबरोबर ड्रेस कोडही नाही त्यामुळे JNUत अतिशय मोकळं वातावरण असून सर्वच देशातल्या तरूणांना त्याचं आकर्षण असतं. या मोकळेपणाच्या अनेक गोष्टी बाहेर चर्चेला जात असतात.

'मॉब लिंचिंग'च्या वादावर ओवेसींनी दिलं मोहन भागवतांना 'हे' उत्तर!

इथल्या विद्यार्थी संघटनांवर गेली अनेक वर्ष हे डाव्या संघटनांचं वर्चस्व आहे. त्यामुळे आंदोलनं, संप, विरोध अशा अनेक गोष्टींसाठी JNUचं नाव देशभर चर्चेत असतं. काही वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी नाऱ्यांमुळे JNUची पुन्हा देशभर चर्चा सुरू झाली. आता या नव्या नियमांना डाव्या विद्यार्थीसंघटनांनी तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतलाय.

पार्थ प्रचाराला येणार का? रोहित पवारांनी दिलं हे उत्तर!

तर बेबंदशाही आणि स्वैराचाराला आळा घालण्यासाठी काही नियम आवश्यक असल्याचं प्रशासनाचं मत आहे. शिस्त लावण्यासाठी अशा नियमांची गरज असून हे नियम कुठलेही जाचक नियम नाहीत असंही प्रशासनाने म्हटलं आहे. मात्र सरकार हुकूमशाही करत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: JNU
First Published: Oct 9, 2019 07:57 AM IST

ताज्या बातम्या