मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

असा आहे मान्सूनच्या परतीचा मार्ग, मुंबईसह या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस!

असा आहे मान्सूनच्या परतीचा मार्ग, मुंबईसह या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस!

परतीच्या पावसाला सुरुवात होण्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

परतीच्या पावसाला सुरुवात होण्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

परतीच्या पावसाला सुरुवात होण्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
मुंबई, 09 ऑक्टोबर : मंगळवारी मुंबईसह उपनगरांला पावसाने झोडपून काढलं. ठाणे, डोंबिवली, भिवंडीत जोरदार पाऊस सुरू होता. डोंबिवलीमध्ये तर 4 तासांपेक्षा जास्त वीज पुरवठा खंडीत झाला होता. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं असून आता परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. बुधवार आणि गुरुवारनंतर राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. परतीच्या पावसाला सुरुवात होण्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असल्यामुळे परतीच्या पावसालाही उशिर होत आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बुधवारी महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक पावसासह मेघगर्जना होणार असल्याचा अंदाज आहे. तर 11 आणि 12 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस तर मेघगर्जना होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर 9 आणि 10 ऑक्टोबरला मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. इतर बातम्या - Research: आता न घाबरता रोज प्या चहा, कारण... 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील या भागात होणार वादळी पाऊस नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती 11 ऑक्टोबरपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर बातम्या - मेट्रोचं काम सुरू असताना आढळला तब्बल 13 फुटांचा अजगर, पाहा हा VIDEO दरम्यान, वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या हवामानाच्या स्थितीनुसार त्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि विजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, पत्र्याच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे. इतर बातम्या - VIDEO : हे तुमच्या कर्मानं डोळ्यात पाणी, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात
First published:

Tags: Heavy Rain, Maharashtra weather, Mumbai rain, Weather updates

पुढील बातम्या