elecपुणे, 2 मार्च : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या दोन्ही निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी आहे. मतमोजणीच्या 15 व्या फेरीनंतर धंगेकरांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर -
पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडत आहे. जनतेने त्यांना स्विकारलं नाहीए. कसबा विधानसभेची जनता स्वाभिमानी आहे आणि ती जनता कधी पैशाला भीक घालत नाही. आशीर्वाद घेणे ही परंपरा आहे. त्यामुळे मी 100 टक्के गिरीश बापट यांना भेटायला जाणार आहे. 50 खोके एकदम ओके हे फक्त इथेच नाही तर महाराष्ट्रात दिसतंय. आणि हे परिवर्तन राज्यभर होणार आहे. शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर, असेही ते म्हणाले.
Pune Bypoll election Results : चिंचवडमध्ये अजितदादांना धक्का, बंडखोराने डाव उलटवला, भाजपला फायदा
रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेतून झाली. त्यानंतर ते बराच काळ राज ठाकरे यांच्या मनसेत होते. मनसेमध्ये असताना धंगेकर यांची राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते, अशी ओळख होती. धंगेकर यांनी मनसेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आणि इथूनच धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख उंचावला. मात्र, नंतर त्यांनी पुन्हा पक्षांतर केले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धंगेकर हे तब्बल 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. याकाळात आपण कसब्यामध्ये बरीच विकासकामं केल्याचा दावा ते करतात.
पुणे पोटनिवडणुकीचे लाईव्ह अपडेट्स इथे पाहा
विधानसभेत फक्त 7 हजार मतांनी हरले -
प्रभागातील विकासकामांच्या जोरावर त्यांनी मनसेकडून 2009 ची विधानसभा निवडणूक लढली. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना मोठे आव्हान दिले. कसब्यातील दिग्गज नेते असणारे बापट नवख्या धंगेकरांपुढे अवघ्या 7 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Maharashtra politics, Pune, Pune Bypoll Election