जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune Bypoll election Results Live : कसब्याचा निकाल लागला, रवींद्र धंगेकर विजयी

Pune Bypoll election Results Live : कसब्याचा निकाल लागला, रवींद्र धंगेकर विजयी

Pune Bypoll election Results Live : कसब्याचा निकाल लागला, रवींद्र धंगेकर विजयी

Pune bypoll election results कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यातून पोस्टल मतमोजणीदरम्यान पहिला कल हाती आला आहे. मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 2 मार्च : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या दोन्ही जागांसाठी रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के मतदान झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात