जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुणेकरांनो सावधान! शहरात नव्या घातक विषाणूची एन्ट्री, 4 वर्षीय बालकाला लागण

पुणेकरांनो सावधान! शहरात नव्या घातक विषाणूची एन्ट्री, 4 वर्षीय बालकाला लागण

पुणेकरांनो सावधान! शहरात नव्या घातक विषाणूची एन्ट्री, 4 वर्षीय बालकाला लागण

मेंदूज्वराची बाधा झालेला हा शहरातला पहिला रूग्ण आहे. या बालकाला नोव्हेंबरच्या सुरुवातीला ताप आणि डोकेदुखी अशी लक्षणे होती. ताप वाढून त्याला तापेचा झटका आला.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे 02 डिसेंबर : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात प्रथमच ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण आढळून आला आहे. ही बाधा झालेल्या वडगाव शेरी येथील 4 वर्षांच्या बालकावर 3 नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयात बालरोग विभागात उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्याचा अहवाल एनआयव्हीमधून आला असून, तो ‘जेई’ पॉझिटिव्ह आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून रुग्णाच्या परिसरातील ताप आणि डासांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. Aurangabad Measles Update : मुंबईत आलेला गोवर आता राज्यभर पसरतोय; औरंगाबादमध्ये थैमान, आरोग्य मंत्री आहेत तरी कुठे? मेंदूज्वराची बाधा झालेला हा शहरातला पहिला रूग्ण आहे. या बालकाला नोव्हेंबरच्या सुरुवातीला ताप आणि डोकेदुखी अशी लक्षणे होती. ताप वाढून त्याला तापेचा झटका आला. त्यात त्याचा एक हात आणि पायदेखील कमकुवत झाला. त्याला सुरुवातीला खासगी आणि नंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्यानंतर हा बालक दहा दिवस रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामध्ये थोडी सुधारणा झाली असून सध्या तो ससूनमध्ये सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार घेत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

गेल्या 2 दिवसांपासून हा रुग्ण ज्या भागात सापडला आहे, तिथं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. त्या रुग्णाच्या घरातील तसेच आजूबाजूच्या घरातील विशेषतः 15 वर्षाखालील मुलांचे रक्त नमुने घ्यायला सुरवात केली आहे. तसेच त्या परिसरात तापाच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. दररोज 500 ते 600 लोकांचं सर्वेक्षण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.. Corona Vaccine Deaths : कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू झाल्यास जबाबदार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण आतापर्यंतच्या इतिहासात पुणे शहरात ‘जेई’चा हा पहिलाच रुग्ण आढळून आलेला आहे. क्युलिस डासामुळे होणारा हा मेंदूज्वर पुण्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे अशी काही लक्षणं आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune , virus
  • First Published :
जाहिरात
जाहिरात