मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad Measles Update : मुंबईत आलेला गोवर आता राज्यभर पसरतोय; औरंगाबादमध्ये थैमान, आरोग्य मंत्री आहेत तरी कुठे?

Aurangabad Measles Update : मुंबईत आलेला गोवर आता राज्यभर पसरतोय; औरंगाबादमध्ये थैमान, आरोग्य मंत्री आहेत तरी कुठे?

मुंबई पाठोपाठ आता नाशिक, धुळे, औरंगाबादमध्येही गोवरच्या साथीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे औरंगाबाद आरोग्य यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे.

मुंबई पाठोपाठ आता नाशिक, धुळे, औरंगाबादमध्येही गोवरच्या साथीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे औरंगाबाद आरोग्य यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे.

मुंबई पाठोपाठ आता नाशिक, धुळे, औरंगाबादमध्येही गोवरच्या साथीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे औरंगाबाद आरोग्य यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

औरंगाबाद, 02 डिसेंबर : मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात गोवरच्या साथीने धुमाकूळ घातला आहे. गोवरची साथ झपाट्याने वाढत असल्याने मुंबईतील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान मुंबई पाठोपाठ आता नाशिक, धुळे, औरंगाबादमध्येही गोवरच्या साथीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे औरंगाबाद आरोग्य यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. दरम्यान औरंगाबाद शहरात काल एका दिवसांत 7 गोवर बाधित रुग्ण पहिल्यांदाच आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी 14 संशयित रुग्ण देखील आढळले आहेत.

औरंगाबाद शहराच्या गारखेड्यातील विजयनगर, चिकलठाणा आणि नेहरूनगर या तीन भागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसांत 7 गोवर बाधित रुग्ण पहिल्यांदाच आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबत खबरदारी म्हणून आरोग्य विभाग तातडीने कामाला लागले आहे. याचबरोबर 14 रुग्ण संशयीत आढळल्याने त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा : पुणेकरांनो सावधान! शहरात नव्या घातक विषाणूची एन्ट्री, 4 वर्षीय बालकाला लागण

यापूर्वी औरंगाबाद शहरात 10 रुग्ण वाढले होते. तर दुसऱ्या दिवशी काल (दि.01) आणखी 7 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे.

मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा म्हणाले की, आरोग्य विभागाने 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना लसीचा अतिरिक्त डोस देण्याची सूचना केली केली आहे. शहरात गुरुवारी सात बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गोवरबाधित बालकांमध्ये विजयनगर तीन, कैसर कॉलनी एक, बायजीपुरा एक आणि भवानी नगरमधील दोन बालकांचा समावेश आहे.

तसेच अंबिकानगर, गणेश कॉलनी, नक्षत्रवाडी, नारेगाव, एन-8, चिकलठाणा, हर्सल, हर्षनगर या भागांत प्रत्येकी एक आणि बायजीपुरा आणि पुंडलिकनगर भागांत प्रत्येकी दोन याप्रमाणे 14 बालके संशयित आढळली आहेत. सर्व संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचा : ...तसं मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झालं, शिवसेनेनं केली मोठी भीती व्यक्त, शिंदेंनाही टोला

बालकांमध्ये गोवरचं वाढतं प्रमाण औरंगाबादकरांची चिंता वाढवणारा ठरत आहे. कारण औरंगाबाद शहरात आत्तापर्यंत 17 मुलांना गोवरची लागण झाली आहे. त्यातच संशयीतांचा आकडा 80 वर पोहचला आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभागाकडून पालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

आरोग्यमंत्री आहेत कुठे?

महाराष्ट्राला गोवरच्या साथीने घेरलं असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत कुठे आहेत? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र सामनातून (Samana) करण्यात आला. तसेच तानाजी सावंत यांना दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, असे बक्षीसही सामनातून जाहीर करण्यात आले होते.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, BJP, Health, Shiv sena