Home /News /pune /

12 फूटांपर्यंत बर्फ, कडाक्याची थंडी! अशा परिस्थितीत मराठी जवानांनी उभारलं काश्मीरमध्ये श्रीमंत दगडूशेठचे मंदिर

12 फूटांपर्यंत बर्फ, कडाक्याची थंडी! अशा परिस्थितीत मराठी जवानांनी उभारलं काश्मीरमध्ये श्रीमंत दगडूशेठचे मंदिर

जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना बुधवारी करण्यात आली आहे.

    पुणे, 09 जुलै : जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) गुरेज सेक्टरमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Shrimant Dagadusheth Halwai Ganpati) प्रतिष्ठापना बुधवारी करण्यात आली आहे. काश्मीरमधील 6 मराठा बटालियनमधील मराठी जवानांच्या कुटुंबानी संकष्टी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृती असलेल्या मूर्तीची स्थापना केली. काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये कंजलवान या गावी मंदिर बांधण्यात आलं आहे. यासाठी दगडूशेठ मंदिर ट्रस्टकडे गणपतीची प्रतिकृती मूर्ती द्यावी, अशी मागणी मराठा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी केली होती. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी 36 इंचाची मूर्ती काश्मीरला पाठवली. मुख्य म्हणजे मूर्तीकारानं ही मूर्ती अवघ्या 12 दिवसात घडवली. (हे वाचा-लष्कराच्या जवानांना आता वापरता येणार नाही FACEBOOK आणि INSTAGRAM, पाक-चीनचा धोका) ही मूर्ती पुण्याचे तरुण शिल्पकार विपुल खटावकरने यांनी घडवली. कर्नल विनोद पाटील यांनी दगडूशेठ ट्रस्टला पत्र पाठवत प्रतिकृती मूर्तीची मागणी केली होती. विनोदी पाटील यांनी सांगितले की, “मंदिर उभारणीसाठी सर्व जवानांनी योगदान दिले. मंदिर बांधण्याच्याकामाला सुरुवात केली तेव्हा त्या जागेवर चार ते पाच फूट बर्फ होता. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हा बर्फ 12 फुटांपर्यंत वाढत गेला. मात्र जवान थांबले नाहीत. चीड या झाडाच्या लाकडाचा उपयोग जवानांनी हे मंदिर उभारले”. बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृती असलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. (हे वाचा-VIDEO - आधी उपचार मग म्युझिक; ड्युटीनंतर कोरोना रुग्णांसाठी नर्स वाजवते वायोलिन) (हे वाचा-पहिल्यांदाच कोरोनाचं नवं रुप समोर, 4 वेळा टेस्ट करूनही रिपोर्ट निगेटिव्ह पण..) संपादन - प्रियांका गावडे
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Indian army

    पुढील बातम्या