Home /News /lifestyle /

VIDEO - आधी उपचार मग म्युझिक; ड्युटी संपल्यावर कोरोना रुग्णांसाठी नर्स वाजवते वायोलिन

VIDEO - आधी उपचार मग म्युझिक; ड्युटी संपल्यावर कोरोना रुग्णांसाठी नर्स वाजवते वायोलिन

डॉक्टर, नर्स कोरोना रुग्णांच्या सेवेत तसूभरही कसर सोडत नाहीत. आपल्या परीने जे शक्य आहे ते सर्व करत आहेत.

    सँटियागो, 08 जुलै : आपण घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला कोरोना तर होणार नाही ना? अशी भीती आज आपल्या प्रत्येकाच्या मनात घराबाहेर पडताना असतेच. मग थेट कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी काय करावं. उलट आपण आपल्या घरातील सदस्यांसह तरी घरात आहोत मात्र हे कोरोना योद्धा कित्येक तास आपल्या कुटुंबापासून दूर राहतात आणि घरी परतल्यानंतरही आपल्या घरच्यांना कोरोनची लागण होईल या भीतीने ते त्यांच्यापासून दूर राहतात. अशा परिस्थितीतही कोरोना योद्धा रुग्णसेवेत तसूभरही कसर सोडत नाहीत. आपल्या परीने जे काही करता येईल ते करतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये कित्येक तास रुग्णसेवा करून ड्युटी संपल्यानंतरही रुग्णालयात थांबून नर्स कोरोना रुग्णांसाठी वायोलिन (nurse play violin) वाजवते. चिलीच्या (Chile) इल पिनो रुग्णालयातील हा व्हिडीओ आहे. या रुग्णालयात काम करणारी 26 वर्षांची नर्स डॅमारीस आपली ड्युटी संपल्यानंतर वायोलिन वाजवून रुग्णांना प्रोत्साहित करते. डॅमारीसची ड्युटी संध्याकाळी सहा वाजता संपते. त्यानंतर ती आपल्या हातात वायोलिन घेते आणि ते वाजवत रुग्णालयातील वॉर्डमध्ये फिरते. आठवड्यातून दोन दिवस ती रुग्णांसाठी वायोलिन वाजवते. रॉयटर्सशी बोलताना डॅमालिस म्हणाली,  "माझ्या वायोलिनमधून मी या रुग्णांना थोडंसं प्रेम, थोडासा विश्वास आणि थोडी आशा देते. प्रत्येक वेळी मी हे अगदी मनापासून करते. रुग्ण जेव्हा म्युझिक ऐकतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तेज येतं, ते आनंदी होतात आणि टाळ्या वाजवून दादही देतात. हे पाहून खूप बरं वाटतं, मनाला एक समाधान मिळतं" हे वाचा - 'हाय गरमी...' नोरा फतेहीच्या गाण्यावर PPE सूटमधील डॉक्टरचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO काही दिवसांपूर्वीच मुंबईतील डॉ. रिचा नेगी यांनीदेखील पीपीई सूट घालून हाय गरमी या नोराच्या गाण्यावर तुफान डान्स केला होता आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आपल्या सहकाऱ्यांचं मनोरंजन करण्यासाठी आणि नकारात्मकता घालवण्यासाठी त्यांनी डान्स केल्याचं सांगितलं आहे. नर्स डॅमारीस असो किंवा डॉ. रिचा असे अनेक कोरोना योद्धा आपल्या आणि रुग्णाच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी, रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा मग रुग्ण बरं झाल्यानंतरचा आनंद व्यक्त करण्यासाठी असेच काहीसे प्रयत्न करताना दिसत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Video

    पुढील बातम्या