पहिल्यांदाच कोरोनाचं नवं रुप समोर, 4 वेळा कोरोनाची टेस्ट करूनही रिपोर्ट निगेटिव्ह पण...

पहिल्यांदाच कोरोनाचं नवं रुप समोर, 4 वेळा कोरोनाची टेस्ट करूनही रिपोर्ट निगेटिव्ह पण...

महिलेचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 जुलै : देशात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस सुरूच आहे. आता आणखी एक धक्कादायक बाबा समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना शरीरात आपलं रूप बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हायरसचं आणखीन एक धक्कादायक रुप समोर आलं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात असाच एक प्रकार समोर आला आहे. महिलेचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात एक महिलेची प्रकृती खालवल्यानं उपचारासाठी तिला दाखल करण्यात आलं. डायबेटीस आणि हायपरटेंन्शनसोबत तिची प्रकृती अधिक खालावत चालल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आल्यानं त्यांनी कोरोनाची चाचणी केली. 80 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी एकदा नाही तर चार वेळा निगेटिव्ह आली. या महिलेला कोरोनाचं संक्रमण झाल्याचा संशय डॉक्टरांना आल्यानंतर त्यांनी सर्वात अत्याधुनिक असलेलं तंत्रज्ञान आरटी-पीसीआरच्या सहाय्यानं चाचणी केली. मात्र तरीही महिलेचे रिपोर्ट 12 दिवसांत 4 वेळा चाचणी करून निगेटिव्ह आले.

रिपोर्ट निगेटिव्ह आले पण तरीही महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं डॉक्टरही चक्रावले आणि त्यांनी थोडी जोखीम पत्करून महिलेवर कोरोनाचे उपचार सुरू केले. कोरोनाच्या उपचारानंतर मात्र धक्कादायक बाबा समोर आली. या महिलेची पाचव्यांचा चाचणी करण्यात आली त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी एन्टीबॉडी तयार होत असल्याचं समोर आलं.

हे वाचा-पाऊस आणि कोरोना दोघांपासून वाचवणारा Covid Umbrella; अनोख्या छत्रीचा Video Viral

अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार 25 जून ते 7 जुलैदरम्यान या महिेलेची चाचणी करण्यात आली होती. मात्र दरवेळी रिपोर्ट निगेटिव्ह येत होता. कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी ही सर्वोत्कृष्ट चाचणी असल्याचे म्हटले जाते. पण महिलेची प्रकृती सुधारत नाही हे पाहून त्यांनी कोरोनाचे उपचार सुरू केले. त्यानंतर पुन्हा एकदा तपासणी केली तेव्हा शरीरात एन्टीबॉडीज मिळाल्यानंतर महिलेच्या शरीरात कोरोनाचे विषाणू येऊन गेल्याचं समोर आलं. या विषाणूनं चाचण्यांनाही चकवा दिल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं डॉक्टरही चक्रावले.

अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षण आढळली नाही तरीही कोरोना व्हायरसचे विषाणू शरीरात प्रवेश करू शकतात त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी काही वेळा त्यांच्या शरीरावर ते परिणाम करतीलच असं सांगता येत नाही.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 9, 2020, 7:56 AM IST

ताज्या बातम्या