Home /News /national /

लष्कराच्या जवानांना आता वापरता येणार नाही FACEBOOK आणि INSTAGRAM, पाक आणि चीनचा धोका

लष्कराच्या जवानांना आता वापरता येणार नाही FACEBOOK आणि INSTAGRAM, पाक आणि चीनचा धोका

नोव्हेंबर महिन्यातच सरकारने अधिकृत कामांसाठी WhatsAppचा वापर न करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले होते.

    नवी दिल्ली 8 जुलै: पाकिस्तान आणि चीनचा हेरगिरीचा धोका लक्षात घेऊन लष्कराच्या जवानांना आता सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. FACEBOOK आणि INSTAGRAM सह तब्बल 89 Apps वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे सर्व Apps डिलीट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जवानांच्या मोबाईमध्ये हे Apps आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पाकिस्तान आणि चीन हे सोशल मीडियाचा वापर करून पाळत ठेवत असल्याची काही प्रकरणं उघडीस झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सैनिक आणि अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये फसवून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेण्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. हे  Apps  वापरणाऱ्याचा सगळा डेटा आणि माहिती ती भारताबाहेर असलेल्या त्यांच्या सर्व्हर रुमला पाठवतात. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही हे धोकादायक ठरू शकतं त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. नोव्हेंबर महिन्यातच सरकारने अधिकृत कामांसाठी WhatsAppचा वापर न करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले होते. तर अनेक अधिकाऱ्यांना त्यांचे फेसबुक अकाउंट्स डिलिट करण्याचे आदेशही दिले गेले होते. तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई देखिल करण्यात आली होती. सोशल मीडिया अकाउंटवर युनिफॉर्म्समधले फोटो न टाकणे, लोकेशन्सविषयी माहिती उघड न करणे असे अनेक निर्देश या आधी देण्यात आले होते. मात्र अनेकदा या निर्देशांचं उल्लघन होत असल्याचंही आढळून आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे कडक निर्देश जारी करण्यात आल्याची माहिती लष्करातल्या प्रशासनाने दिली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Indian army, Social media

    पुढील बातम्या