• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • SPECIAL REPORT : इंग्रजी शाळा, नको रे बाबा! पुण्यात आता झेडपी-मनपा शाळांचा नवा 'पॅटर्न'

SPECIAL REPORT : इंग्रजी शाळा, नको रे बाबा! पुण्यात आता झेडपी-मनपा शाळांचा नवा 'पॅटर्न'

पुणे जिल्ह्यात यावर्षी झेडपी शाळांचा हजेरी पट चक्क 37 हजारांनी वाढला आहे.

  • Share this:
पुणे, 25 जुलै : कोरोना (corona) काळातही खासगी इंग्रजी शाळांनी (English school fee) फी कपात न केल्याने शेकडो पालकांनी आता जिल्हा परिषद (zp school pune) आणि महानगर पालिकेच्या शाळांचा (pmc school) पर्याय निवडला असल्याचं समोर आलं आहे. याचं कारण म्हणजे, पुणे जिल्ह्यात झेडपी शाळांचा हजेरी पट यावर्षी तब्बल 37 हजारांनी वाढलाय तर पुणे मनपा शाळांमध्येही साडेतीन हजाराच्यावर मुलांनी नव्याने प्रवेश घेतला आहे. पुणे शहरातील एकट्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील मनपा शाळांचा ट्रान्सफर चार्टनुसार यावर्षी एकाच उपनगरातील तब्बल 397 मुलांनी खासगी शाळांमधून मनपा शाळेत प्रवेश घेतला आहे. मनपा शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल साडेतीन हजाराच्यावर मुलं खासगी शाळांमधून मनपा शाळांमध्ये ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे, हा आकडा आणखी वाढू शकतो, असंही पुणे मनपाच्या शिक्षण मंडळाने सांगितलंय. या प्रायव्हेट टू पब्लिक स्कूल मायग्रेशनचं एक प्रमुख कारण हे आहे की, कोरोना काळातही खासगी शाळांनी फी कपात केली नाही म्हणून मुलाला सरकारी शाळेत टाकलंय, असं मत पालकांनी व्यक्त केलंय. विवाहाच्या दिवशी मुलीच्या मनात असतात ‘या’ अपेक्षा; मुलांनी नक्की वाचा होईल फायदा पुणे जिल्ह्यात यावर्षी झेडपी शाळांचा हजेरी पट चक्क 37 हजारांनी वाढला आहे. त्यापैकी खासगी टू सरकारी शाळा मायग्रेशनचा आकडा तब्बल 20 हजारांच्यावर असल्याचं सीईओ आयुष प्रसाद यांनी म्हटलंय. कोरोनामुळे गेली दीड- दोन वर्षे शाळा बंदच आहेत. अशातच शेकडो मध्यमवर्गीय पालकांच्या नोकऱ्या गेल्यात तर अनेकांची पगार कपात झाली आहे. त्यामुळे खासगी शाळांची महागडी फी पालक भरूच शकत नाही. पण तरीही खासगी शाळा पाच पैशांचीही फी कपात करायला तयार नाहीत. म्हणूनच मग अशा नडलेल्या पालकांनी सरळ सरकारी शाळेत आपली मुलं टाकावीत, असं आवाहन पुणे शिक्षण विभागाचे उपसंचालक औंदुबर उकिर्डे यांनी केले आहे.

अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट; लग्नात तरुणांनी घातला धुडगूस, VIDEO पाहून हादराल!

मध्यंतरी 'सो कॉल्ड' स्टेट्स मेन्टेन करण्याच्या नादात मध्यमवर्गीय पालक या खासगी इंग्रजी शाळांकडे आकर्षित झाला होता. पण कोरोना काळात शाळा बंद असूनही या नफेखोर शिक्षण सम्राटांनी फी कपातीला नकार दिल्याने पालकांनी आता सरळ सरकारी शाळांचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे आता सरकारी शाळांनी हा सकारात्मक प्रतिसाद कायम ठेवण्यासाठी आपला शैक्षणिक दर्जा उंचावण्याची गरज आहे.
Published by:sachin Salve
First published: