मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

विवाहाच्या दिवशी मुलीच्या मनात असतात ‘या’ अपेक्षा; मुलांनी नक्की वाचा, होईल फायदा!

विवाहाच्या दिवशी मुलीच्या मनात असतात ‘या’ अपेक्षा; मुलांनी नक्की वाचा, होईल फायदा!

लग्नानंतर (After Marriage) मुलगी आपलं घर सोडून एका परक्या घरामध्ये राहायला येते. तेव्हा तिला तिथे फक्त पतीचा आधार असतो त्यामुळेच ती त्याच्याकडून काही अपेक्षा करते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 जुलै :  विवाह (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. विवाहानंतर पती आणि पत्नी (Husband & Wife) दोघांच्या आयुष्यात काही बदल होत असतात. पण, मुलीला सर्वात जास्त बदलांना सामोरं (Changes in Life) जावं लागतं. आपल्या आई-वडिलांचं घर सोडून जेव्हा, मुलगी आपल्या पतीच्या घरी राहायला येते. त्यावेळी तिच्या मनामध्ये अनेक शंका, विचार आणि भीती देखील असते. अनेक विचारांमुळेच विवाहाच्या वेळी मुली इमोश्नल (Emotional) होतात. त्यामुळे लग्नाच्या दिवशी होणाऱ्या पतीकडून काही अपेक्षा मनात बाळगतात. याच दिवशी पत्नीला आपला पती खरंच आयुष्यभर आपली साथ देणार का ? याची जाणीव होते.

पहा पत्नी पतीकडून कोणत्या 5 अपेक्षा ठेवते

1.लग्नाचे विधी, आलेले पाहुणे या सगळ्यांमध्ये मुलगी गोंधळून गेलेली असते. तिच्या मनामध्ये अनेक भावनांचा डोम उठलेला असतो. या परिस्थितीमध्ये होणाऱ्या नवऱ्याने जास्त वाट पाहायला न लावता अगदी वेळेमध्ये मुहूर्तावर लग्नासाठी उपस्थित रहावं असं तिला मनातल्या मनात वाटत असतं.

2. मुलीने त्यादिवशी केलेला सगळा साजशृंगार आपल्या पतीसाठी असतो. त्यामुळे सगळ्यांनीच कौतुक केलं तरी, आपल्या पतीची कॉम्प्लिमेंट मिळावी. त्याने तिच्या सौंदर्याचं कौतुक करावं असं तिला वाटतं असतं.

3. लग्नाच्या दिवशी केलेल्या शृंगारात तिला वावरणं कठीण झालेलं असतं. लग्नात नेसलेली हेवी साडी किंवा घागरा यामुळे तिला चालणंही कठीण होतं. त्यामुळे स्टेजवर येताना पतीने आपला हात देऊन सावरून घ्यावं असं तिला वाटत असतं.

4. लग्नाच्या दिवशी फोटो शूट केलं जातं. अशा वेळेस फोटोग्राफर अनेक पोज द्यायला सांगतात. त्यामुळे तिला थोडा अवघडलेपणा जाणवत असतो. पतीने यावेळी कम्फर्टेबल फिलिंग द्यावं असं तिला वाटतं असतं.

5. मुलं लग्नाच्या दिवशी आपला मित्र परिवार आणि कुटुंबाच्या गराड्यांमध्ये अडकून पडतात. तेव्हा मुलीला वाटत असतं की पतीने तिच्या कुटुंबाच्या सदस्यांबरोबर आणि मैत्रिणींबरोबर देखील थोडासा वेळ व्यतीत करावा.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Marriage, Relationship tips