• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट; लग्नात तरुणांनी घातला धुडगूस, VIDEO पाहून हादराल!

अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट; लग्नात तरुणांनी घातला धुडगूस, VIDEO पाहून हादराल!

तरीही तरुण स्वत:चा जीव धोक्यात घालून अशा प्रकारचे स्टंट करतात.

 • Share this:
  जालोर, 24 जुलै : राजस्थानमधील जीवघेण्या स्टंटचा  (Deadly Stunts) व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. वाहन चालकाचा थोडासा निष्काळजीपणा झाला तर त्याला याची किंमत मोजावी लागू शकते आणि संपूर्ण कुटुंबाला याचा फटका सहन करावा लागू शकतो. इतकच नाही जर समोरून कोणतं वाहन आलं तर अपघात होऊ शकला असता. हायवेवर अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी तरुण अशा प्रकारचे स्टंट करताना दिसतात. यावर पोलिसांकडून कारवाईही केली जाते. मात्र तरीही तरुण स्वत:चा जीव धोक्यात घालून अशा प्रकारचे स्टंट करतात. मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण मुलं लग्नाला जात आहे. यादरम्यान ही तरुण मुले दारू पिऊन जीवघेणे स्टंट करीत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन गाड्या पुढे मागे दिसत आहे. दोन्ही गाड्या एकमेकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे तरुण दारू पिऊन गाडीच्या खिडकीबाहेर डोकं काढत आहेत आणि गाडी चालक अत्यंत जीवघेण्या पद्धतीनं गाडी चालवित आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: