मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच संपवलं; 19 वर्षीय विवाहितेच्या हत्येनं पुणे हादरलं

जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच संपवलं; 19 वर्षीय विवाहितेच्या हत्येनं पुणे हादरलं

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Pune: पुण्यातील एका तरुणानं आपल्या नवविवाहित पत्नीची गळा आवळून हत्या (husband killed wife by strangulation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 22 ऑगस्ट: पुण्यातील (Pune) वडगाव धायरी (Vadgaon Dhayari) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या नवविवाहित पत्नीची गळा आवळून हत्या (husband killed wife by strangulation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमविवाह (Love Marriage) झालेल्या तरुणानं एका क्षुल्लक कारणातून आपल्या पत्नीचा गळा घोटला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

निशा अजय निकाळजे असं हत्या झालेल्या 19 वर्षीय विवाहित तरुणीचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा विवाह विजय निकाळजे (वय-21) नावाच्या तरुणाशी झाला होता. दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं प्रेमविवाह केला होता. दोघंही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी आहेत. लग्नानंतर कामाच्या शोधात विजय नवविवाहित पत्नी निशाला घेऊन पुण्यात आला होता. काही दिवस पुण्यातील जनता वसाहतीत राहिल्यानंतर ते वडगाव धायरी परिसरात वास्तव्याला गेले होते.

हेही वाचा-रात्री विचित्र आवाजांमुळे नवऱ्याला आली जाग; बायको गायब,CCTV पाहिला तर धक्का बसला

याठिकाणी त्यांचा संसार सुखानं सुरू होता. पण काही दिवसांतच विजय निशावर चारित्र्याचा संशय घेऊ लागला. 'तू सातत्यानं मोबाइलवर कोणाशी बोलतेस' असं विचारत त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. चारित्र्याच्या संशयातून विजय आणि निशा यांच्यात अनेकदा भांडणं झाली. शुक्रवारीही दोघा पती-पत्नीत वाद झाला. यावेळी रागाच्या भरात विजयनं निशाचा गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा-जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकली 15 वर्षांची राबिता;आईच्या उत्तरानंतर केली आत्महत्या

याप्रकरणी पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर, फरार पती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून फरार आरोपी पतीचा शोध घेतला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Murder, Pune