जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकली 15 वर्षांची राबिता; आईच्या उत्तरानंतर गळफास घेऊन आत्महत्या

जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकली 15 वर्षांची राबिता; आईच्या उत्तरानंतर गळफास घेऊन आत्महत्या

जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकली 15 वर्षांची राबिता; आईच्या उत्तरानंतर गळफास घेऊन आत्महत्या

या मुलीने मोहरमच्या दिवशीच गळफार घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आईला अनेक प्रश्न विचारले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

इंदूर, 21 ऑगस्ट : इंदूरमध्ये (Indore News) एका 15 वर्षांच्या मुलीने मोहरमच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आईला काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तर ऐकल्यानंतर मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या अशा मृत्यूमुळे आईवर तर शोककळा पसरली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

जाहिरात

काय विचारलं होतं मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने आईला काही प्रश्न विचारले होते. तिने आईला विचारलं की, इमाम हुसेन आजच्याच दिवशी शहीद झाले होते? आज ज्या लोकांचा मृत्यू होतो, त्यांना शहादद मिळते? ते जन्नतमध्ये जातील? आईने यासर्वांचं उत्तर हो असं दिलं. यानंतर काही वेळात मुलीने गळफार घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुलीके रावजी बाजार येथील चंपा बाप स्थित हाथीपाला येथील आहे. येथे राबियाचे वडील इकबाल शेख आपल्या संपूर्ण कुटुंबासह मोहरमनिमित्ताने शुक्रवारी सायंकाळी रोजा सोडण्यासाठी बसले होते. आईने मुलीच्या आवडीची खीरदेखील तयार केली होती. रोजा सोडण्यापूर्वी केवळ एका प्रश्नाने मुलीचा जीव घेतला. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. हे ही वाचा- रात्री विचित्र आवाजांमुळे नवऱ्याला आली जाग; बायको गायब,CCTV पाहिला तर धक्का बसला

दोन दिवसांपूर्वी 11 पुस्तकं खरेदी केली होती कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, काही दिवसांपूर्वी राबिता हिचं 11 वीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. एडमिशनसाठी 3800 रुपयेदेखील भरले होते. दोन दिवसांपूर्वी तिला 11 वीच्या वर्गातील पुस्तकं खरेदी करून दिली होती. ती खूप आनंदात होती, मात्र तिने हे पाऊल का उचललं? यामागील कारण अद्याप त्यांच्या लक्षात आलं नाही.

जाहिरात

पिकनिकमध्ये मैत्रिणीचा झाला होता मृत्यू कुटुंबीयांनी सांगितलं की, काही वर्षांपूर्वी तिच्या शाळेची पिकनिक राऊ सर्कलजवळ गेली होती. येथे राबिताची मैत्रिण पाळण्यावरुन खाली पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर राबिता काही विचित्र बडबड करीत होती. जिवन आणि मृत्यू काय आहे? आपण कधीही मरू शकतो, असं काहीसं बोलत राहायची. अनेकदा आई-वडिलांनी यावरुन तिला ओरडलेही होते. मात्र मैत्रिणीच्या मृत्यूनंतर ती मानसिक रित्या खचून गेली होती.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात