मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रात्री विचित्र आवाजांमुळे नवऱ्याला आली जाग; बायको गायब, CCTV पाहिला तर धक्काच बसला

रात्री विचित्र आवाजांमुळे नवऱ्याला आली जाग; बायको गायब, CCTV पाहिला तर धक्काच बसला

सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पतीला जबर धक्का बसला असून तो तणावात आहे.

सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पतीला जबर धक्का बसला असून तो तणावात आहे.

सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पतीला जबर धक्का बसला असून तो तणावात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : सध्या विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार सध्या उघडकीस आला आहे. त्याचं झालं असं की लग्नानंतर महिलेला शेजारी राहणारा पुरुष आवडू लागला. पतीला न सांगता अनेकदा ती शेजारी राहणाऱ्या प्रियकराला भेटायला जात असे.

एकदा पतीने सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पतीला मोठा धक्का बसला. मी तुला कधीच माफ करणार नाही, असं पतीने तिला ठणकावून सांगितलं. द सनने दिलेल्या बातमीनुसार, पत्नीने दगा दिल्यानंतर पतीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो याचा चांगला मित्र असून तोदेखील विवाहित आहे. एका रात्री तो सीसीटीव्हीचं फुटेज तपासत असताना याचा उलगडा झाला. (At night the husband woke up to strange noises Wife disappeared shocked to see CCTV)

हे ही वाचा-सहाव्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होते माजी मंत्री; पत्नीनेच घडवली तुरुंगवारी

एके दिवशी रात्री झोपलेला असताना पतीला काही विचित्र आवाज येऊ लागले. घरात चोर शिरल्याच्या संशयाने तो घाबरला. तो सीसीटीव्ही फुटेज तपासू लागला. यातील दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. त्याची पत्नी शेजारी राहणाऱ्या त्याच्या मित्राला किस करीत असल्याचं सीसीटीव्हीत पाहिलं. त्यानं पत्नीला याबद्दल विचारलं असता पत्नी माफी मागेल अशी त्याची आशा होती. मात्र यावर पत्नी म्हणाली की, माझं शेजारच्यावर प्रेम असून मला तुझ्यासोबत राहायचं नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून पत्नी शेजारील व्यक्तीसोबत वेळ घालवत असल्याचं तिनं पतीला सांगितलं. यासाठी तिनं पतीलाच जबाबदार धरलं. तो आधीसारखा प्रेम करीत नाही, काळजी घेत नाही, त्यामुळे मी शेजारच्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचं पत्नीने सांगितलं.

First published:

Tags: Cctv footage, Love, Marriage, Wife and husband