मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणेकरांच्या आनंदावर विरजण; गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच रद्द, नेमकं काय घडलं?

पुणेकरांच्या आनंदावर विरजण; गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच रद्द, नेमकं काय घडलं?

gautami patil

gautami patil

गौतमीचा कार्यक्रम पुन्हा एकदा नाकारण्यात आला आहे. यावेळी पुणे पोलिसांनी गौतमीला दणका दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 फेब्रुवारी : जिच्या डान्सनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे अशा गौतमी पाटीलच्या नियोजित कार्यक्रमाची परवानगी पुन्हा एकदा नाकारण्यात आली आहे. 10 फेब्रुवारीला गौतमीचा पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी ऐन वेळी पुण्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. पुण्यातील शिवणे येथे गौतमीचा कार्यक्रम होती. शिवणे येथील धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटीलच्या हस्ते होणार होते. परंतू ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार होता तिथल्या जागेची NOC आणि ट्रॅफिक NOC नसल्याने पोलिसांकडून परवानगी नाकारली. गौतमी पाटीलची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात वाढली आहे.   महाराष्ट्रात गौतमीचा कार्यक्रम कोणत्याही जिल्ह्यात असो कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी होत असते. गौतमीच्या पुण्यातील कार्यक्रमातही प्रचंड गर्दी होण्याची शक्यता होती.

काही दिवसांआधीच राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलवर भाष्य केलं होतं.  महाराष्ट्रात अनेक पक्षाचे लोक गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करतात मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही गौतमीला बोलावण्याचे प्रकार घडल्यानंतर अजित पवार चांगलेच संतापले.  लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात बंदी आहे. याची सविस्तर माहिती घेणार. परंपरा टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल त्यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडेन, असं अजितदादा म्हणाले.

हेही वाचा - सोशल मीडियावर व्हायरल झालेली डान्सर गौतमी पाटील कोण आहे? पाहा Inside Story

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवार कायमस्वरुपी बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती. सातारा कोर्टानं तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गौतमीच्या कार्यक्रमात मोठी गर्दी होते आणि त्या गर्दीत अनेक वाईट प्रकार घडतात. तसंच लावणीच्या नावाखाली अश्लिल डान्स करत असल्याचा आरोप गौतमीवर वारंवार करण्यात येतोय. मात्र गौतमीला मिळणारे कार्यक्रम काही यामुळे कमी झालेले नाहीत.

गौतमीची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. गौतमी ही मुळची धुळे जिल्ह्यातील असून तिचं वय 26 वर्ष आहे. तिचं शिक्षण केवळ दहावी झालंय. धुळ्यातील सिंदखेडा या ठिकाणीच दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. मागची 9-10 वर्षापासून गौतमी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. डान्ससाठी कुठे प्रशिक्षण घेतलेलं नाहीये. इतरांचे पाहून ती डान्स करायला शिकलीये. गौतमी लवकरच घुंगरू या सिनेमात दिसणार आहे. तिच्या या सिनेमातील एक गाणं देखील रिलीज झालंय.

First published:
top videos

    Tags: Gautami Patil, Marathi news, Pune