Home /News /pune /

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    पुणे, 15 फेब्रुवारी : निवृत्त न्यायमूर्ती आणि एल्गार परिषदेचे माजी अध्यक्ष पी बी सावंत (Justice PB Sawant)यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते.  पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला होता.  त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. सावंत यांनी  मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एल.एल.बी) मिळविल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे वकील म्हणून सराव सुरू केला.  1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सहा वर्ष त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. 1995  मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून ते सार्वजनिक कार्यात सक्रिय होते. IND vs ENG : पुजारा विचित्र पद्धतीनं आऊट, टीम इंडियाची टॉप ऑर्डर गडगडली! तसंच, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी 1 सप्टेंबर 2003 रोजी स्थापन केलेल्या पी. बी. सावंत कमिशनचे अध्यक्ष होते. त्यांनी आपला अहवाल फेब्रुवारी 2005 मध्ये सादर केला होता, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते. परंतु, त्यांनी विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले होते. यामुळे दोन कॅबिनेट मंत्री सुरेश जैन आणि नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा लागला होता. अभिनेता सचिननं केला कोट्यवधींचा घोटाळा; ईडीनं केली अटक त्याचबरोबर सावंत यांनी एल्गार परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. पी बी सावंत यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यामुळे वकिली आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra, Mumbai, P. B. Sawant death, Pune

    पुढील बातम्या