जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता सचिननं केला कोट्यवधींचा घोटाळा; ईडीनं केली अटक

अभिनेता सचिननं केला कोट्यवधींचा घोटाळा; ईडीनं केली अटक

अभिनेता सचिननं केला कोट्यवधींचा घोटाळा; ईडीनं केली अटक

सचिननं 100 कोटींचा गैरव्यवहार केला होता. या प्रकरणी त्याची 18 तास चौकशी करण्यात आली. परंतु या चौकशीत अपेक्षित माहिती समोर न अल्यामुळं अखेर ईडीनं त्याला अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 फेब्रुवारी : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सचिन जोशीला (Sachin Joshi) सक्तसवसुली संचलनालयानं (ED) अटक केली आहे. सचिन हा गुटखा किंग म्हणून ओळखले जाणारे जगदीश जोशी यांचा मुलगा आहे. त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशी यांनी तब्बल 100 कोटींचा गैरव्यवहार केला होता. या प्रकरणी त्याची 18 तास चौकशी करण्यात आली. परंतु या चौकशीत अपेक्षित माहिती समोर न अल्यामुळं अखेर ईडीनं त्याला अटक केली आहे. (money laundering case) सचिन हा एक प्रसिद्ध उद्योजक देखील आहे. विजय मल्ल्याचा गोव्यामधील किंगफिशर व्हिला खरेदी केल्यामुळं तो व्यवसायिक म्हणून पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. याशिवाय देशभरात त्याचे अनेक रेस्तराँ आणि क्लब आहेत. 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सचिनला ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र समन्स बजावल्यानंतही सचिन जोशी ईडी कार्यालयात हजर झाला नव्हता. यानंतर त्याला चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणण्यात आलं. तेथे 18 तास त्याची चौकशी करण्यात आली. परंतु अपेक्षित उत्तरं न दिल्यामुळं अखेर ईडीनं त्याला अटक केली. अवश्य पाहा -  बॉलिवूडचे रुल्स ब्रेकर; रणधीर यांनी मुलींसाठी तोडले कपूर कुटुंबीयांचे नियम ईडीनं याआधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांध्ये सहभागी असलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांपैकी ओमकार ग्रुप एक आहे. याशिवाय मुंबईत अनेक मोक्याच्या ठिकाणी ओमकार ग्रुपचे प्रकल्प सुरु आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात