Home /News /sport /

IND vs ENG : पुजारा विचित्र पद्धतीनं आऊट, टीम इंडियाची टॉप ऑर्डर गडगडली!

IND vs ENG : पुजारा विचित्र पद्धतीनं आऊट, टीम इंडियाची टॉप ऑर्डर गडगडली!

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात चेन्नईमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टचा सोमवारी तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं रन आऊट झाला.

    चेन्नई, 15 फेब्रुवारी :  भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG)  यांच्यात चेन्नईमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टचा सोमवारी तिसरा दिवस आहे. भारतीय टीमला तिसऱ्या दिवशी सकाळी तीन झटपट धक्के बसले. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) जोडीनं तिसऱ्या दिवशी खेळ सुरू केला. पहिल्या डावातील शतकवीर रोहितकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 26 रन्सवर आऊट झाला. बेन फोक्सनं त्याला सुरेख पद्धतीनं आऊट केलं. त्यापूर्वी भारतीय टीमची नवी वॉल असलेला चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं रन आऊट झाला. कसा झाला पुजारा आऊट? मोईन अलीच्या बॉलवर पुजारानं फटका मारला. सिली पॉईंटवर उभ्या असलेल्या ऑली पॉपनं तो बॉल अडवून विकेट किपर बेन फोक्सकडं फेकला. पुजारा क्रिजमध्ये परतला होता. पण त्यापूर्वी त्याच्या हातामधून बॅट निसटली होती. त्यामुळे पुजारा रन आऊट होऊन परत फिरावं लागलं. पुजारा फक्त सात रन काढून आऊट झाला. चेन्नईच्या पिचवर संयमी बॅटिंग करणे अवघड आहे, हे लक्षात येताच ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. अजिंक्य रहाणेच्या आधी आलेला पंत फार कमाल करु शकला नाही. पंत फक्त 8 रन काढून आऊट झाला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेला रहाणे दुसऱ्या डावात झटपट आऊट झाला. रहाणेनं फक्त 10 रन काढले. मोईन अलीलं त्याला आऊट केलं. रहाणे आऊट झाल्यानं भारताची निम्मी टीम 100 च्या आत आऊट झाली आहे. टीम इंडियाची सध्या 300 पेक्षा जास्त रनची आघाडी झाली असून फिरत्या पिचवर ही आघाडी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bizarre runout, Cricket, India vs england, IPL 2021, Pujara, Pujara bat stuck in the pitch, Team india

    पुढील बातम्या