VIDEO पुणे पोलिसांची कमाल! खारीसाठी बाहेर पडलेल्या तरुणाला काय शिक्षा दिली पाहा

VIDEO पुणे पोलिसांची कमाल! खारीसाठी बाहेर पडलेल्या तरुणाला काय शिक्षा दिली पाहा

खारी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो असं सांगणाऱ्या या तरुण मुलाला पुणे पोलिसांनी भन्नाट शिक्षा दिली. हा VIEDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

पुणे, 28 एप्रिल : पुणे शहरातला Coronavirus चा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एकीकडे चिंता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे काही पुणेकर मंडळी मात्र अनावश्यक कामांसाठी बाहेर पडत आहेत. सतत आवाहन करूनही घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस अनेक वेगवेगळ्या शिक्षा करत आहेत. पुणेकर पोलीससुद्धा कायद्याचा धाक दाखवण्यासाठी काही कल्पक शिक्षांमुळे चर्चेत आहेत त्याचाच अनुभव या व्हायरल झालेल्या या VIDEO ने दिला.

काहीतरी किरकोळ कारणासाठी बाहेर पडलेल्या तरुणाला पोलिसांनी हटरल्यानंतर नाष्ट्यासाठी खारी आणायला जात असल्याचं त्यानं सांगितलं. त्याच्या या 'महत्त्वाच्या' कारणापुढे पोलीसही अवाक झाले. शेवटी कारवाई म्हणून फटके मारण्याऐवजी पोलिसांनी एक नामी युक्ती केली. या तरूणाला चक्क एक डझन केळी देऊन ती खायला लावली.

वाचा - बापरे! मास्क लावला नाही, तर 8 लाख रुपयांचा दंड; कोणत्या देशाने घेतला हा निर्णय?

'जर आत्ता ही केळी खाल्ली नाही तर गुन्हा दाखल करू', असा सज्जड दमही दिला. अखेर 10 केळी खाल्ल्यावर या तरुणाची सुटका केली, ती पुन्हा बाहेर न पडण्याची तंबी देऊनच. हाच VIDEO व्हायरल झाला आहे.

पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 1563 इतकी झाली आहे. रुग्णवाढीचा वेग पुण्यात सर्वाधिक आहे. त्यामुळेच शहरात निर्बंधांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. फक्त 7 दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत आणि मृत्यूदरही देशाच्या तुलनेत खूप जास्त आहे. आतापर्यंत 243 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच 53 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 16670 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 15,706 चा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 14162 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1563 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

अन्य बातम्या

EXCLUSIVE VIDEO बाहुबलीचा हिंदी आवाज होता या मराठी कलाकाराचा, शेअर केला अनुभव

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी हत्याकांड, बापानेच 2 मुलांना घातल्या गोळ्या

कोरोना व्हायरस आला कुठून? चीनच्या वुहान लॅबच्या खुलाश्याने गुढ वाढलं

 

First published: April 28, 2020, 9:05 PM IST

ताज्या बातम्या