• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • बापरे! मास्क लावला नाही, तर 8 लाख रुपयांचा दंड; कोणत्या देशाने घेतला हा निर्णय?

बापरे! मास्क लावला नाही, तर 8 लाख रुपयांचा दंड; कोणत्या देशाने घेतला हा निर्णय?

या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.

या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.

आजाराची लागण होऊ नये आणि तो पसरू नये यासाठी मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे.

 • Share this:
  बर्लिन, 28 एप्रिल : जर्मनीमध्ये कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी कायदे कडक करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार जर्मनीत सार्वजनिक वाहतूक, लांब पल्ल्याच्या ट्रेन आणि दुकानांत सामान खरेगी करताना मास्क लावणे आवश्यक आहे. सोमवारपासून नवा नियम देशातील 16 पैकी 15 राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. बुधवारी शिल्लक राहिलेल्या एका राज्यातही हा कायदा लागू होईल. सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो. यावर सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणे हे मार्ग आहेत. मात्र अनेकदा नागरिकांकडून दुर्लक्ष केलं जातं. आजाराची लागण होऊ नये आणि तो पसरू नये यासाठी मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे. मास्क ड्यूटीच्या नावाने तयार केलेल्या या नव्या कायद्याचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जाईल. दंडाची रक्कम 25 युरो म्हणजेच 2 हजारांपासून ते 10000 युरो म्हणजेच 8 लाख 25 हजार रुपयांपर्यंत असेल. मात्र अनेक राज्यांनी इतक्या मोठ्या दंडाच्या किंमतीवर नकार दर्शवला आहे. बर्लिन आणि ब्रॅंडेनबर्ग यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, जनतेला मास्क लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. मात्र इतक्या मोठ्या संख्येने दंड आकारला जाणार नाही. याबाबत राज्यांकडून जनतेला विविध सूचना दिल्या जात आहेत. संबंधित -जेएनयूमध्ये ‘रामायणा’वरुन ‘महाभारत’, नव्या वादाची ठिणगी धारावी पोखरतोय कोरोना, 24 तासांत 42 रुग्ण; 4 जणांचा मृत्यू धक्कादायक! अ‍ॅम्ब्युलन्स नाही...मदत नाही...बापाला हातगाडीवर घेऊन धावत होता मुलगा
  Published by:Meenal Gangurde
  First published: