कोरोना व्हायरस आला कुठून? चीनच्या वुहान लॅबच्या खुलाश्याने गुढ वाढलं

कोरोना व्हायरस आला कुठून? चीनच्या वुहान लॅबच्या खुलाश्याने गुढ वाढलं

मुख्य म्हणजे ज्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे, ते शहर आता कोरोनामुक्त झाले आहे.

  • Share this:

बीजिंग 28 एप्रिल: जगभर धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आला कुठून याचं गुढ अजुनही कायम आहे. जगातल्या अनेक देशांनी यासाठी चीनवर आरोप केले आहेत. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसला थेट वुहान व्हायरस असं म्हटलं होतं. त्यामुळे चीनने त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. वुहानमध्ये असलेल्या प्रयोगशाळेतूनच या व्हायरसचा प्रसार झाला असा आरोप होतोय. या आरोपांना वुहान लॅबच्या प्रमुखांनी उत्तर दिलंय. Reutersशी बोलतांना त्यांनी याबाबतचा जो खुलासा केला त्यामुळे या व्हायरसचं गुढ आणखी वाढलं आहे.

वुहानच्या Wuhan Institute of Virology (WIV)चे प्रमुख युवान झिमिंग यांनी लॅबवर होत अससलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. केवळ बदनाम करण्यासाठीच असे आरोप केले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. असा व्हायरस तयार करण्याची आणि त्यात बदल करण्याची क्षमता आमच्या लॅबमध्ये नाही आणि हा व्हायरस कोठून आला याची आम्हालाही माहिती नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

वुहान लॅबच्या जवळ असलेल्या प्राण्यांच्या मार्केटमध्ये असलेल्या वटवाघळांवर संशोधन सुरू होतं. त्यांच्यामध्ये हा व्हायरस सापडला आणि या लॅबमधून तो पसरला अशं सांगितलं जात आहे.

अमेरिकेने तर याची चौकशी सुरू केली असून यात चीन दोषी आढळला तर त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.

Coronavirus बदलतोय! तुम्ही कल्पनाही केली नसेल इतकं भयंकर आहे अकरावं रूप

दरम्यान,  अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, चीन कोरोनाला रोखू शकला असता, "आम्ही सध्या या सगळ्याची तपासणी करत आहोत योग्य वेळ आल्यानंतर याबाबत माहिती देण्यात येईल". मुख्य म्हणजे ज्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे, ते शहर आता कोरोनामुक्त झाले आहे. ट्रम्प यांनी चीनवर हमला करत सांगितले की, आम्ही खुप गंभीर तपासणी करत आहे. आम्ही चीनसोबत खुश नाही आहोत, हे सर्वांना माहित आहे.

Coronavirus चं कम्युनिटी संक्रमण तर नाही ना? आता सांडपाण्याची तपासणी होणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे असेही म्हटले की, "आम्ही सध्याच्या परिस्थितीवर खुश नाही आहोत. कारण आम्हाला वाटतं की कोरोनाला थांबवणं शक्य होतं. आज संपूर्ण जग यातना भोगत आहे. किमान 184 देश कोरोनासाठी असुरक्षित आहेत". विशेष म्हणजे चीनमधून उद्भवणार्‍या कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये बरीच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

First published: April 28, 2020, 8:32 PM IST

ताज्या बातम्या