चंद्रपूर, 28 एप्रिल: बल्लारपूर शहरात भगतसिंग वॉर्डात झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. ज्येष्ठ भाजप नेत्याच्या घरी ही गोळीबाराची घटना घडली आहे. या नेत्याच्या भावाने स्वतःच्या 2 मुलांना घरगुती भांडणानंतर रिव्हॉल्व्हरने गोळ्या घातल्या आणि स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मुलांवर गोळ्या झाडून स्वत: आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव मूलचंद द्विवेदी आहे. या गोळीबारानंतर रुग्णालयात नेताना एका मुलाचं निधन झालं तर दुसरा मुलगा अत्यवस्थ आहे. चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आलं आहे. गोळीबार आणि आत्महत्येचे नेमके कारण मात्र अज्ञात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. हेही वाचा.. आणखी 2 साधूंची हत्या, भाजपमध्ये ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’, काँग्रेसचा सवाल मूलचंद द्विवेदी (वडील), आकाश द्विवेदी (22, थोरला मुलगा) अशी मृतांची नावं असून धाकटा मुलगा पवन द्विवेदी (15) हा गंभीर जखमी झाला आहे.घटनास्थळी पोलिस पोहोचले असून तपास सुरु आहे. गोळीबार आणि आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कौंटुबीक वादातून हे हत्याकांड झाल्याचं बोललं जात आहे. हेही वाचा.. पुण्यात इन्फोसिसच्या इंजिनिअरची आत्महत्या; 12 व्या मजल्यावरून मारली उडी मूलचंद द्विवेदी हे एका रोकड वाहतूक करणाऱ्या कंपनीत गार्ड असल्याचं समजते. भाजप नेते शिवचंद द्विवेदी यांच्या घरीच वरच्या माळ्यावर वास्तव्याला होता. मूलचंद द्विवेदी हे उत्तर प्रदेशात गेले होते. ते घरी आल्यानंतर त्यांचे आणि मुलांचे कडाक्याचं भांडण झालं. त्यातूनच मूलचंद द्विवेदी यांनी मुलांना गोळ्या घातल्या. नंतर स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.