Home /News /pune /

पुण्यात मृत्यूदर अखेर आटोक्यात; 24 तासांत मृत्यू नाही, बाधितांचा आकडा 627

पुण्यात मृत्यूदर अखेर आटोक्यात; 24 तासांत मृत्यू नाही, बाधितांचा आकडा 627

देशात कोरोनाच्या साथीत सर्वाधिक मृत्युदर नोंदवलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे.

पुणे, 20 एप्रिल : पुण्यात Coronavirus बाधितांची संख्या वाढत आहे, तशी मृत्यूंची संख्याही वाढती होती. देशात कोरोनाच्या साथीत सर्वाधिक मृत्युदर नोंदवलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे.  देशाचा सरासरी कोरोनाचा मृत्युदर 3 टक्क्यांच्या आसपास असताना पुण्यात हाच दर 10 टक्क्यांच्या पुढे होता. तो आता 8 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे गेल्या 24 तासांत शहरात एकाही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही. ससून रुग्णालयात 48 तासात एकही मृत्यू नाही. याच रुग्णालयात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू नोंदले गेले होते. पुण्यात मृत्युदरात थोडी घट झाली असली, तरी अद्याप संसर्ग कमी झालेला नाही. गेल्या 24 तासांत 65 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता पुण्यात रुग्णसंख्या 627 झाली असून आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू नोंदला गेला आहे. पण अद्याप शहरात 16 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातं. पुण्यात 53 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. मुंबईला कोरोनाचा धोका कायम, राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला 4,666चा टप्पा आज पुण्यात पोलिसांनी शहराच्या विविध भागात 295 जणांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं. या रुग्णांपर्यंत पोहोचण्यात यश आलं आहे. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. ससूनचा मृत्युदर आटोक्यात ससूनमध्ये कोरोनारुग्ण फटाफट दगावत असल्याने घबराट पसरली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण येतानाच गंभीर अवस्थेत दाखल होत असल्याने या रुग्णालयातला मृत्युदर जास्त होता. पण तरीही अखेर मृत्युदर आटोक्यात आणण्यात ससूनच्या प्रशासनाला अखेर यश आलं आहे. ससूनमध्ये गेल्या 48 तासात एकही मृत्यूची नोंद नाही. या शासकीय रुग्णालयात कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची उचलबांगडी करण्यात आली होती.  या रुग्णालयाची जबाबदारी सध्या उपअधिष्ठाता डॉ.  मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. कोरोना व्हायरला प्रसार वेगाने होत असल्याने सरकारने पुण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री 12 पासून पुणे महापालिका हद्दीच्या सर्व सीमा सील करण्यात येत आहेत. त्यामुळे कुणीही सीमा हद्दीच्या बाहेर किंवा आत येऊ शकणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागला असं प्रशासनाने म्हटलं आहे. अन्य बातम्या ZP अधिकाऱ्याकडून नियमांची पायमल्ली, संचारबंदीत पुण्यात गेला बायकोला भेटायला! कोरोनाव्हारसविरोधातील लसीसाठी इज्राइलच्या शास्त्रज्ञाला मिळालं यूएस पेटंट केदारनाथच्या गुरुंना केलं क्वारंटाइन, मुकुट पोहोचवण्यासाठी 1800 KM केला प्रवास
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या