जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाव्हारसविरोधातील लसीसाठी इज्राइलच्या शास्त्रज्ञाला मिळालं यूएस पेटंट

कोरोनाव्हारसविरोधातील लसीसाठी इज्राइलच्या शास्त्रज्ञाला मिळालं यूएस पेटंट

अजुनही किमान 8 महिन्या त्यासाठी लागण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्ण चाचण्या झाल्याशीवाय जागतिक आरोग्य संघटना अशा औषधांना मान्यता देणार नाही असं WHOने सांगितलं आहे.

अजुनही किमान 8 महिन्या त्यासाठी लागण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्ण चाचण्या झाल्याशीवाय जागतिक आरोग्य संघटना अशा औषधांना मान्यता देणार नाही असं WHOने सांगितलं आहे.

तेल अवीव युनिव्हर्सिटीचे (Tel Aviv University) च्या शास्त्रज्ञाला युनाटेड पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसकडून पेटंट देण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

तेल अवीव, 20 एप्रिल : कोरोनाव्हायरसविरोधात (Coronavirus) इज्राइलच्या (Israel) एका शास्त्रज्ञाला कोरोनाव्हायरसविरोधातील लसीसाठी यूएस पेटंट मिळालं आहे. जेवीशे प्रेस ने याबाबत वृत्त दिलं आहे. तेल अवीव युनिव्हर्सिटीचे (Tel Aviv University) चे प्राध्यापक जोनाथन गरशोनी  (Jonathan gershoni) यांनी ही लस प्रस्तावित केली. त्याला युनाटेड पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसकडून पेटंट देण्यात आलं आहे. गरशोनी हे गेल्या 15 वर्षांपासून कोरोनाव्हायरसवर काम करत आहेत. त्यांनी सार्स आणि मर्स व्हायरसवरही भरपूर संशोधन केलं आहे. हे वाचा -  Coronavirus विरोधात लढा : भारताने अशी आखली रणनीती, विकसित देशही झाले फेल गरशोनी यांनी सांगितलं, “कोरोनाव्हायरस हा मानवी शरीरातील पेशींच्या प्रोटीनमार्फत पेशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर इतर पेशींमध्ये पसरतो. अशाप्रकारे शरीरातील लाखो पेशींवर तो हल्ला करतो. ही लस कोरोनाव्हायरसच्या संरचनेवरच हल्ला करून त्याला निष्क्रिय करण्यात सक्षम आहे. “ही लस विकसित होण्यासाठी एक वर्ष लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर त्याचं क्लिनिकल ट्रायल सुरू होईल”, असंही ते म्हणाले. दरम्यान इज्राइलमधील 2कंपन्यांनीही याआधी कोरोनाव्हायरसविरोधात लस बनवल्याचा दावा केला आहे. जूनपर्यंत या लसीची मानवी चाचणी सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. हे वाचा -  लसीच्या आशेवर राहू नका, कोरोनाच्या दहशतीत जगावं लागेल; WHO ने केलं सावध तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की सध्या तरी कोरोनाव्हायरसविरोधात कोणतीही सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित होण्याची शक्यता नाही. कोविड-19 साठी जागतिक आरोग्य संघटनेचे दूत आणि लंडनच्या इम्पेरिअल कॉलेजमधील ग्लोबल हेल्थचे प्राध्यापक डेव्हिड नॅबारो म्हणाले, “कोरोनाविरोधात यशस्वी लस तयार होईलच असं नाही, त्यामुळे कोरोनाव्हायरसच्या दहशतीतच जगावं लागेल. प्रत्येक व्हायरसविरोधात एक सुरक्षित आणि प्रभावी अशी लस तयार करू शकत नाही. काही व्हायरस असे असतात, ज्यांच्याविरोधात लस तयार करणं कठिण असतं. त्यामुळे कोरोनाव्हायरसविरोधात लस निश्चित आणि लवकर बनेल या आशेवर राहू नका. व्हायरसच्या धोक्यात आपलं आयुष्य जगण्याचा नवा मार्ग शोधावा लागेल. नव्या परिस्थितीशी माणसांना जुळवून घ्यावं लागेल” संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात