Home /News /maharashtra /

ZP अधिकाऱ्याकडून नियमांची पायमल्ली, संचारबंदीत पुण्यात गेला बायकोला भेटायला!

ZP अधिकाऱ्याकडून नियमांची पायमल्ली, संचारबंदीत पुण्यात गेला बायकोला भेटायला!

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी संचारबंदीत पदाचा गैपवापर केल्याचं समोर आलं आहे.

उस्मानाबाद, 20 एप्रिल: उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी संचारबंदीत पदाचा गैपवापर केल्याचं समोर आलं आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करत वाहनाने पुणेवारी केलेल्या पवारांना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच पुणेवारी करून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोना विषाणूच्या संकटात सामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालं आहे. त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. उच्च अधिकारीच नियम पायदळी तुडवत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हेही वाचा.. पुण्यात 100 टक्के कर्फ्यू लागू, दिवसभरात 23 नव्या रुग्णांची नोंद अजिंक्य पवार हे उस्मानाबादच्या बँक कॉलनीत एका खासगी जागेत भाड्याने राहतात. ते उस्मानाबादेत एकटेच राहतात तर त्यांचे कुटुंब पुण्यात राहते. ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी 17 एप्रिलला पुण्यात गेले होते. आज (20 एप्रिल) पहाटे ते उस्मानाबादेत परत आले. धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडे प्रशासनाचा अधिकृत पास नाही. पदाचा दुरुपयोग करून ते पुण्याला शासकीय वाहनाने गेले होते. अशी तक्रार स्थानिक नगरसेवकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यापूर्वीही ते दोन वेळा पुण्याला जावून आल्याचे या नगरसेवकाचे म्हणणे आहे. हेही वाचा...धक्कादायक! विलगीकरण कक्षाच्या इमारतीवरुन संशयित रुग्णांनं घेतली उडी याप्रकरणाची आता जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी गंभीर दखल घेतली आहे. संजय कोलते यांनी अजिंक्य पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत 24 तासांत त्यांना खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, पवार यांना पुणेवारी करून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Osmanabad news

पुढील बातम्या