मुंबई, 20 एप्रिल : केदारनाथ (Kedarnath) आणि बद्रीनाथ (Badrinath) या मंदिराचे दार उघडण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच ही तारीख पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे. आता केदारनाथचे दार 14 मे आणि बद्रिनाथचे दार 15 मे रोजी उघडतील. उत्तराखंडचे सांस्कृतिक मंत्री सतपाज महाराज यांनी सोमवारी याची घोषणा केली. केदारनाथच्या गुरुंनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Narendra Modi) रस्त्याच्या मार्गाने केदारनाथला जाण्याची मागणी केली होती. परवानगी मिळाल्यानंतर गुरु रावल नांदेड येथून 1800 किमी रस्त्याने केदारनाथ येथे पोहोचले. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याशिवाय बद्रीनाथचे मुख्य गुरू प्रसाद नामबुद्री हे केरळमधील कुन्नूर येथून 2900 किमी अंतर पार करीत बद्रीनाथला पोहोचतील. केदारनाथशी संबंधित धर्माधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, दार कधी उघडणार याचा निर्णय मंगळवारी ऊखीमठमधील बैठकीत होईल. सतपाल महाराज यांच्या घोषणेबद्दल माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी केदारनाथचं दार 29 एप्रिल रोजी उघडण्याचा आणि बद्रीनाथचे दार 30 मे रोजी उघडणार होते. यमनोत्री आणि गंगोत्री याच्या मंदिराची दारं उघडण्याची तारीखही बदलण्याची शक्यता आहे. नेहमी ही मंदिरं अक्षय तृतीयेला खुली होत होती. जी यंदा 26 एप्रिल रोजी आहे. परंपरेनुसार केवळ रावलच मूर्तीला स्पर्श करु शकतात केदारनाथचे रावल (गुरु) महाराष्ट्र किंवा कर्नाटक व केरळमधील आहे. हे लोक दरवर्षी येथे प्रवासासाठी येतात. परंपरेनुसार केदारनाथचे रावल स्वत: पूजा करत नाहीत, परंतु त्यांच्या सूचनेनुसार पुजारी मंदिरात पूजा करतात. त्याचवेळी बद्रीनाथच्या रावलखेरीज कोणीही बद्रीनाथच्या मूर्तीला स्पर्श करू शकत नाही. संबंधित - धारावीत 24 तासांत 30 नवे कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 168 वर बाजारात एका व्यक्तीचा झाला मृत्यू, सफाई कर्मचाऱ्याने सायकलने शव रुग्णालयात नेलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.