पुणे, 20 ऑगस्ट : पुण्यातील कोरोनाची साथ आता कुठे आटोक्यात येताना दिसू लागली आहे. कारण, गेल्या 10 दिवसांत शहरातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही तब्बल 8 टक्क्यांनी घटली आहे. तसंच पेशंट्स दुपट्टीचा कालावधीदेखील 30 दिवसांवरून 41 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. पुणे शहरात 20 ऑगस्टपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह संख्या 1 लाखांचा आकडा पार करेल, असा अंदाज पुणे मनपाच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला होता.
पुण्यात 19 तारखेला पुण्यातील कोरोना रूग्णसंख्या 76 हजारांच्या आसपास पोहोचली. अशातच बहुतांश Asymptotic पेशंट्स हे घरात बसून उपचार घेऊ लागल्याने पालिकेनं उभारलेली कोविड सेंटर्स ओस पडू लागलीत. यासोबतच आता ऑक्सीजन बेड्सचीही फारसी कमतरता जाणवत नाही आहे. ही पालिकेच्या दृष्टीने निश्चितच दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. पण प्रत्यक्षात खरंच ग्राऊंड रिअंलिटी तशी आहे का तपासण्यासाठी जरा कोरोनाच्या आकडेवारीवरही नजर टाकुयात...
पिंपरीत 7 जणांनी केली तरुणाची हत्या, bjp पदाधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात कोरोनाची साथ नियंञणात?
- एकूण कोरोना चाचण्या 3 लाख 70 हजार
- एकूण पेशंट्स 76 हजार 157
- एकूण अॅक्टिव्ह पेशंट्स 14469
- अॅक्टिव्ह पेशंट्सच्या संख्येत 27 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत घट
- पेशंट्स डबलिंगचा रेट 30 दिवसांवरून 41 दिवसांपर्यंत वाढला
रूग्ण रिकव्हरी दर
- 70 टक्क्यांवरून 78 टक्क्यांवर!
- कोरोना पेशंट्स मृत्यूदर 2.38 टक्के
कोरोनाने नात्यांचा अंत पाहिला, पनवेलमध्ये समोर आली काळजाचं पाणी करणारी घटना
या दिलासादायक आकडेवारीवरून पुण्यात कोरोनाचा आलेख फ्लँटन झाल्याचं वाटत असलं तरी पालिका प्रशासन आताच कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाहीत. म्हणूनच पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल यांनी पुणेकरांना गणेशोत्सवाच्या काळात विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, आता पुण्यातल्या खासगी हॉस्पिटलमध्ये बाहेरचे अनेक गंभीर कोरोना पेशंट्स उपचारासाठी दाखल येऊन दगावत असल्याने मृत्यूसंख्या वाढताना दिसते आहे. यासोबतच वाढीव बिलाच्याही तक्रारी वाढताहेत. म्हणूनच पालिकेनं दीड लाखांवरील सर्व कोरोना बिलांचं प्रीऑडिट सुरू केलं आहे. त्याद्वारे आतापर्यंत 36 बिलांची रक्कम तब्बल 30 लाखांनी कमी केल्याचं रूबल आगरवाल यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितलं.
Corona ला हरवण्यात मुंबईकरांना यश, पालिकेने दिली आनंदाची बातमी
सिरो सर्वेक्षणात 51 टक्के पुणेकरांना कोरोना होऊन गेल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे पुणे शहर हर्ड इम्यूनिटीच्या दिशेने जात असल्याचाही अंदाज व्यक्त होतो आहे. पण म्हणून लगेच पुणेकरांनी रिलॅक्स होण्याची अजिबात घाई करू नये. कारण, पुणेकरांवरचं कोरोना महामारीचं संकट अजूनही टळलेलं नाही आहे. आजही दररोज हजार-बाराशे नवे पेटशंट्स सापडत आहेत. सो पुणेकरांनो दो गजकी दुरी अभीभी जरूरी है...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pune, Pune news