जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / कंटेनरने अक्षरश: कारला चिरडलं, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मन सुन्न करणाऱ्या अपघाताचा LIVE VIDEO

कंटेनरने अक्षरश: कारला चिरडलं, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मन सुन्न करणाऱ्या अपघाताचा LIVE VIDEO

कंटेनरने अक्षरश: कारला चिरडलं, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मन सुन्न करणाऱ्या अपघाताचा LIVE VIDEO

भरधाव कंटेनरने पाठीमागून धडक दिल्यामुळे कारमधील पती-पत्नीसह 4 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 04 जुलै: मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) एका कारला भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरने (Container) पाठीमागून धडक दिल्यामुळे कारमधील पती-पत्नीसह 4 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. गुरुवारी खोपोली एक्झिट आणि फूड मॉल दरम्यान हा अपघात घडला. या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला आहे. एका कंटेनरवर असलेल्या मिरर कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर एक भरधाव कंटेनरवर चालकाने नियंत्रण सुटले होते. त्यामुळे हा कंटेनर एका कारवर आदळला. काही कळायच्या आत भरधाव कंटेनर कारला ढकलत नेत समोरील ट्रकवर आदळला.

हा अपघात इतका भीषण होता की, यात कार पूर्णपणे कंटेनरच्या चाकाखाली दबली होती. त्यामुळे कारमधील पती-पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर कारची बॉडी कटरच्या सहाय्याने कट करून तिघांना बाहेर काढले. जॅकीन चौटियार, पत्नी लुईसा चौटियार आणि मुलगा डॅरेल चौटियार अशी मृतांची नाव आहे. हे तिघेही पुण्याहून मुंबईतील नायगावकडे जात होते, असं वृत्त दिव्य मराठी ने दिले आहे. पुण्यात ‘आश्रम’ वेब सीरीजची पुनरावृत्ती; अनैतिक संबंधातून व्यावसायिकाची हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे चालकाला कंटेनरवर नियंत्रण मिळवता आले नाही. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाली असून त्यांच्यावर खंडाळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात