मराठी बातम्या /बातम्या /पुणे /थोरात, पटोलेंमध्ये खरच वाद आहे? अशोक चव्हाणांनी सांगितली 'अंदर की बात'

थोरात, पटोलेंमध्ये खरच वाद आहे? अशोक चव्हाणांनी सांगितली 'अंदर की बात'

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात, नाना पटोले वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात, नाना पटोले वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात, नाना पटोले वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 6 फेब्रुवारी :  काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यामधील वाद विकोपाल गेला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र काँग्रेसमध्ये सर्व ऑल इज वेल असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षात कुठलेही मतभेद नसल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं अशोक चव्हाण यांनी?  

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी थोरात, पटोले वादावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, काँग्रेसमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. भाजपकडून मुद्दामहून वावड्या उठवल्या जात आहेत. थोरात यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मी, नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे आम्ही सर्व जण अर्ज भरण्यासाठी आलो आहोत. काँग्रेस मजबुतीनं लढत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Pune Bypoll Election : ...तर टिळकांच्या घरात उमेदवारी देतो; चंद्रकांत पाटलांचं आता थेट पटोलेंना आव्हान

पटोलेंची प्रतिक्रिया 

दरम्यान या वादावर आता नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. भाजपसारखा आम्ही गोंधळ घातल नाहीत, काँग्रेसमध्ये कुठलाही गोंधळ नसून आम्ही मजबुतीने लढत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Ashok chavan, Balasaheb thorat, Congress, Nana Patole, Pune