Home /News /pune /

मुंबईपाठोपाठ पुण्यातही घेतला मोठा निर्णय, विमान प्रवाशांना कोरोना टेस्टची सक्ती

मुंबईपाठोपाठ पुण्यातही घेतला मोठा निर्णय, विमान प्रवाशांना कोरोना टेस्टची सक्ती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत राज्य सरकारने महापालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतला.

पुणे, 23 डिसेंबर: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New strain of virus in UK) आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईपाठोपाठ (Mumbai) आता पुण्यातही (Pune) विमान प्रवाशांना कोरोना टेस्टची (Corona Test) सक्ती करण्यात आली आहे. युरोपियन, आखाती देशामधून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे सक्तीचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Commissioner Vikram Kumar) यांनी दिले आहेत. पुण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी 12 हॉटेल्समध्ये राहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील त्यांना नायडू रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचं आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं आहे. हेही वाचा...धक्कादायक! तीन महिन्यांच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू, नाशिक शहरातील घटना पुणे शहरात काल रात्रीपासून संचारबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसंच मालेगाव शहरातही संचारबंदी लागू झालेली आहे. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी नाईट कर्फ्यूबाबत आदेश काढला आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातही संचारबंदी निर्णय लागू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी (Night curfew in maharashtra) जाहीर केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 22 डिसेंबरपासू करण्यात येत आहे. राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत राज्य सरकारने महापालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतला. हा संचारबंदीचा आदेश आता अनेक महत्त्वाच्या शहरात लागू करण्यात येत आहे. हेही वाचा...मोठ्या भावाला मुखाग्नी दिला अन् लहान भावानेही स्मशानभूमीतच सोडले प्राण तर कलम 188 नुसार कारवाई ठाणे पोलीस आयुक्त विवेक फ़णसळकर यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. आज रात्री पासून ते 5 तारखेपर्यत हे आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लागू असतील. या दिवसांमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी असेल. विनाकारण फेरफटका मारण्यास, सायकल, मोटारसायकल किंवा गाडीने अनावश्यक बाहेर पडल्यास, कलम 188 नुसार कारवाई केली जाणार आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Maharashtra, Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune news

पुढील बातम्या