Home /News /maharashtra /

मोठ्या भावाला मुखाग्नी दिला अन् लहान भावानेही स्मशानभूमीतच सोडले प्राण, शेतकरी भावांची मन सुन्न करणारी घटना

मोठ्या भावाला मुखाग्नी दिला अन् लहान भावानेही स्मशानभूमीतच सोडले प्राण, शेतकरी भावांची मन सुन्न करणारी घटना

अशोक पांडुरंग भुयार या शेतकऱ्यांनी आपला संत्रा बगीच्या विकला होता. मात्र, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांला पैसे न देता उलट शेतकऱ्याला मारहाण केली

अमरावती, 23 डिसेंबर : अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अंजनगाव सर्जी तालुक्यातील धनेगावातील संत्रा उत्पादक शेतकरी अशोक भुयार यांनी आत्महत्या केली होती. आपल्या भावावर अंत्यसंस्कार सुरू असताना; लहान भावाचा स्मशानात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अंजनगाव सर्जी तालुक्यातील धनेगावातील अशोक भुयार यांची संत्रा व्यापाऱ्याने फसवणूक केली होती.  एवढंच नाहीतर संत्रा व्यापारी व पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण केली होती. त्यामुळे अशोक भुयार यांनी मंगळवारी सकाळी आत्महत्या केली होती.  दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गावकरी व नातेवाईकांनी आंदोलन केल्यानंतर रात्री उशिरा पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व  2 संत्रा व्यापारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. "आमच्यात असं काही झालंच नाही" वरुण धवनने 'त्या' चर्चांबद्दल सोडलं मौन अशोक भुयार यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता. मोठ्या भावाच्या मृत्यूचा धक्का बसल्याने लहान बंधू संजय भुयार यांचा स्मशानातच हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले  असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. एकाच दिवशी दोन भावाचा मृत्यू झाल्याने भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशोक पांडुरंग भुयार या शेतकऱ्यांनी आपला संत्रा बगीच्या विकला होता. मात्र, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांला पैसे न देता उलट शेतकऱ्याला मारहाण केली.  याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शेतकरी गेला असता तेथेही शेतकऱ्याची तक्रार न घेता पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी शेतकऱ्याला मारहाण केली. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली व तशी चिठ्ठी देखील लिहून ठेवली. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वॉटरपार्क उघडण्यास परवानगी या प्रकरणी अंजनगाव सूर्जीचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव संत्रा व्यापारी शेख अमीन व शेख गफूर यांनी मारहाण केल्याचं CCTV मध्ये स्पष्ट झाल्याने या तिघांवर 306,34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक जाधव गुन्हा दाखल होताच घटनास्थळ वरून पसार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी सांगितले.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या