Home /News /maharashtra /

धक्कादायक! तीन महिन्यांच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू, नाशिक शहरातील घटना

धक्कादायक! तीन महिन्यांच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू, नाशिक शहरातील घटना

सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधिल पहिलीच घटना आहे.

नाशिक, 23 डिसेंबर: नाशिक शहरात कोरोना संसर्गानं (Coronavirus Nashik) आणखी डोकं वर काढलं आहे. कोरोनामुळे तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू (Three month old baby death due to coronavirus) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासन हादरलं आहे. बालकावर शहरातील एका खासगी रुग्णालयात आठवड्यापासून उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना बालकाची प्राणज्योत मालवली. बाळाला इतरही काही गंभीर आजार होते, असंही समजतं. सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधील पहिलीच घटना आहे. हेही वाचा... उद्धव ठाकरे सरकारनं 25 कोटींची योजना गुंढाळली, भाजपनं सुरू केलं जलसमाधी आंदोलन गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं जिल्हा प्रशासनाची धाकधूक पुन्हा एकदा वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात 324 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक रुग्ण बाधित आढळून आले आहेत. नाकाबंदी लागू.. नाशिक शहरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. राज्य सरकारनं या वेळेत संचारबंदी आदेश दिले आहे. या आदेशान्वये आता शहरात नाकाबंदी केली जाणार आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी दिली आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New strain of virus in UK) आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, राज्यात 22 डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 5 जानेवारीपर्यंत ते लागू राहील. हेही वाचा...राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वॉटरपार्क उघडण्यास परवानगी त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या