पुणे, 06 मार्च : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan case) प्रकरणाचे गूढ अजून उकलले नाही. पुणे पोलिसांनी (Pune Police) आता भाजपचे (BJP) नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस बजावली असून पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिसांच्या या नोटीसीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या 12 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहे. पूजाचा लॅपटॉप हा भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी धनराज घोगरे यांनी नोटीस बजावली असून पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी या नोटीसीतून केली आहे.
आता राखी सावंतचाही येणार BIOPIC? जावेद अख्तर म्हणाले...
या प्रकरणी 12 ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल झाल्या आहेत. त्यातून या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. अखेर पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच नोटीसीमध्ये भाजपच्या नगरसेवकाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आणखी वाद पेटण्याची चिन्ह आहे.
पूजाच्या कुटुंबाकडूनच माझी हत्या होण्याची शक्यता
दरम्यान, पूजा चव्हाणच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप पूजाची चुलत आजी शांताताई राठोड यांनी केला आहे. तसंच 'उद्या माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा', असं आवाहन शांताताईंनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केलं आहे.
VIDEO: डोक्यावर ऊन आणि कुशीत तान्हं बाळ, कर्तव्य बजावतेय वर्दीतील झाशीची राणी
'माझ्यावर तक्रार दाखल झाली हे चुकीचे आहे. मी सत्यासाठी लढा देत आहे. मी पुण्यात जाऊन तक्रार दिली म्हणून झळ लागली. स्वतःच्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी गेला नाहीत, अशी टीका शांताताई राठोड यांनी केली. तसंच, 'तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.