मुंबई 6 मार्च: बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या चित्रविचित्र आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिला तिच्या वक्तव्यांमुळं ट्रोल देखील केलं जात. अलिकडेच तिनं प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) माझ्या आयुष्यावर चित्रपट तयार करणार आहेत. अशी घोषणा केली होती. यामुळं अनेकांनी तिची खिल्ली देखील उडवली. परंतु आता जावेद अख्तर यांनी स्वत: राखीला चित्रपटाबाबत वचन दिल्याचं मान्य केलं. (movie on Rakhi Sawant's life)
जावेद अख्तर यांनी आजवर शोले, दीवार, जंजिर, अंदाज, यादों की बारात, काला पथ्तर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा, गाणी, संवाद लिहिले आहेत. आता ते राखी सावंतच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करणार अशी चर्चा होती. अर्थात ही चर्चा राखीनं केलेल्या घोषणेमुळेच सुरु होती. परंतु ही कुठल्याही प्रकारची अफवा नसल्याचं जावेद अख्तर यांनी मान्य केलं.
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “तीन चार वर्षांपुर्वी विमानात राखी आणि माझी भेट झाली होती. त्यावेळी तिनं मला तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितलं. तिचा संघर्ष ऐकून मी अवाक झालो. अन् त्याचवेळी मी तिला तिच्या आयुष्यावर आधारित एखादा चित्रपट तयार करेन असं म्हणालो होतो. गेल्या काही काळात इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळं मला वेळ मिळाला नाही. परंतु येत्या काळात मी नक्कीच या विषयावर गांभिर्यानं विचार करुन एखादी पटकथा तयार करेन.”
अवश्य पाहा - VIDEO: राखीसाठी सलमान बनला देवदूत; असा वाचवला जवळच्या व्यक्तीचा जीव
View this post on Instagram
कोण आहे राखी सावंत?
राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. १९९७ साली 'अग्निचक्र' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला. किंबहूना तिच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे बॉलिवूडची नवी आयटम गर्ल म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. काम मिळत असलं तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते त्यामुळे अनेक श्रीमंत लोकांच्या लग्नात ती वेटरचं काम देखील करायची. टीना अंबानी यांच्या लग्नात तिला ५० रुपये टीप मिळाली होती हा अनुभव अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितला होता. कधीकाळी एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणाऱ्या राखीनं आपली जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.