काउंटडाऊन सुरू! 'कोविशिल्ड' लस तिसऱ्या टप्प्यात, पुण्यात 4 हॉस्पिटलमध्ये मिळणार डोस

काउंटडाऊन सुरू! 'कोविशिल्ड' लस तिसऱ्या टप्प्यात, पुण्यात 4 हॉस्पिटलमध्ये मिळणार डोस

विशेष म्हणजे तिसऱ्या टप्प्यात देशभरात दीड हजार स्वयंसेवकांवर कोविशिल्ड लसीचा चाचणी होणार

  • Share this:

पुणे, 19 सप्टेंबर: देशात कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. देशात सध्या जास्तीत जास्त टेस्टिंगवरही भर दिला जात आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Serum Institute of India) निर्मिती केलेली "कोविशिल्ड" लसचं काम तिसऱ्या टप्प्यात आहे.

'कोविशिल्ड' लसीच्या तिसऱ्या टप्प्याला ससून हॉस्पिटलमधून सुरूवात होणार आहे. ससूनकडून स्वयंसेवकांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात ससूनसह 4 हॉस्पिटलमध्ये डोस दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे तिसऱ्या टप्प्यात देशभरात दीड हजार स्वयंसेवकांवर कोविशिल्ड लसीचा चाचणी होणार आहे.

हेही वाचा...सरकारचं पितळ उघडं! या आरोग्य योजनेचा केवळ 1 टक्का कोरोनारुग्णांना लाभ

कोरोनाला हरवणारी लस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे, असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. तसेच दोन महिन्यांत कंपनी लसीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे. कोविशिल्ड लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येत आहे. लसीच्या निर्मितीसाठी सीरम आणि ऑक्सपर्ड विद्यापीठात यापूर्वीच करार झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस लसच्या 100 कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन (Bill and Melinda Gates Foundation) आणि गवी (Gavi) यांच्याशी करार केला आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला यांनी दिली आहे.

आदर्श पूनावाला यांनी सांगितलं की, या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. दोन महिन्यांत आम्ही या लसीची किंमत जाहीर करू. अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत (Oxford University) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना व्हायरस लस तयार करीत आहे, ज्याचे टेस्ट रिझल्ट चांगले आले आहेत. आम्ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council of Medical Research - ICMR) यांच्यासमवेत भारतातील हजारो रुग्णांवर या लसीची चाचणी करणार आहोत. मला खात्री आहे की लशीची चाचणी यशस्वी होईल. यापूर्वी पूनावाला म्हणाले होते की, ऑगस्टच्या अखेरीस आम्ही मुंबई आणि पुण्यातील 5000 हजार लोकांवर या लसीची चाचणी घेऊ. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस लसच्या 100 कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन (Bill and Melinda Gates Foundation) आणि गवी (Gavi) यांच्याशी करार केला आहे.

याअंतर्गत कंपनी भारतासह इतर गरीब आणि विकसनशील देशांना कोरोना विषाणूच्या लसचा एक डोस 225 रुपयांत देईल. कंपनी कोविशिल्ड (Covishield) आणि नोव्हाव्हॅक्स (Novavax) या नावाने कोरोना विषाणूची लस भारतात दाखल करणार आहे.

हेही वाचा...लग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच नवविवाहितेची आत्महत्या, धक्कादायक माहिती उजेडात

21 हून अधिक लशीची क्लिनिकल ट्रायल सुरू

दरम्यान, कोरोना व्हायरस लस विकसित करण्यासाठी 200 हून अधिक कंपन्या काम करत आहेत. यातील 21 पेक्षा जास्त लसी क्लिनिकल चाचण्यांमध्ये आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनावर तयार केलेली लसदेखील यापैकी एक आहे. ही लस मानवी चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. भारतात, ते कोविशिल्ड या नावाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सुरू करणार आहेत. ही लस लवकरच जनतेसाठी उपलब्ध होईल, असा कंपनीचा दावा आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाव्यतिरिक्त, कंपनी नोव्हावाक्स लस देखील तयार करेल.

Published by: Sandip Parolekar
First published: September 19, 2020, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading