लग्नाच्या 21व्या दिवशीच नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक माहिती उडेजात

लग्नाच्या 21व्या दिवशीच नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक माहिती उडेजात

लग्न झाल्यानंतर काजल पहिल्यांदाच ती माहेरी आली होती. पण...

  • Share this:

जालना, 19 सप्टेंबर: एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंडेवाडी शिवारात घडली होती. या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली आहे.  ती म्हणजे मृत नवविवाहिता ही अल्पवयीन होती. तिचं वयाच्या अवघ्या 14 वर्षीच लग्न लावून देण्यात आलं होतं. मात्र, तिनं लग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशीच आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी गावातील ग्रामसेवकाने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 3 जणांना अटक केली आहे.

हेही वाचा...OMG! खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

जालना शहरापासून जवळच असलेल्या इंदेवाडी येथील एका 14 वर्षीय नवविवाहितेने गेल्या 26 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. काजल जिवाप्पा नामदे असं मृत मुलीचं नाव आहे. काजलने लग्नानंतर अवघ्या 21 दिवसाअगोदरच विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच ती माहेरी आली होती. नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी जालना तालुका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक धक्कादायक माहिती उजेडात आली. सदर मृत नवविवाहितेचं वय अवघे 14 वर्षे असून 5 ऑगस्ट रोजी घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं होतं. लग्नाच्या अवघ्या 21 व्या दिवशी म्हणजे 26 ऑगस्ट रोजी तिने माहेरी येऊन गळफास घेवून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत विवाहितेचं माहेर आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

नामदे आणि काटकर कुटुंबाने लॉकडाऊन सुरू असतानाच ऑगस्ट महिन्यात काजल नामदे या 14 वर्षीय मुलीचा विवाह  केला होता. या विवाहानंतर काजल खूपच अस्वस्थ होती. अखेर 26 ऑगस्ट रोजी तिने आत्महत्या करत आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या घटनेची कुठेही वाच्चता झाली नाही. अखेर इंदेवाडीच्या नगरसेवकांनी या प्रकरणाला वाचा फोडली. ग्रामसेवकांन दिलेल्या तक्रारीवरून मृत काजलच्या माहेर आणि सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा....

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नामदे आणि काटकर कुटुंबातील 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आपल्या समाजातील बालविवाहासारखं दाहक वास्तव समोर आलं आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून सदर घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 19, 2020, 2:53 PM IST

ताज्या बातम्या