Home /News /pune /

जयंत पाटलांनी जे फुकट मिळालं ते हजम करावं, चंद्रकांतदादांचा सणसणीत टोला

जयंत पाटलांनी जे फुकट मिळालं ते हजम करावं, चंद्रकांतदादांचा सणसणीत टोला

नवीन काही सुरू करायचं नाही. मात्र, जे सुरू आहे ते बंद करण्यात हे सरकार पटाईत

पुणे, 12 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Ncp Leader Jayant Patil) यांनी जे फुकट मिळालं आहे ते हजम करावं, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Bjp Leader chandrakant Patil) यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात (Pune) बोलत होते. अण्णासाहेब पाटील महामंडळ बरखास्त करण्याच्या निर्णयावर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्या नेतृत्त्वातील सरकारवरही निशाणा साधला. राज्यातील सरकारला नवीन काही सुरू करायचं नाही. मात्र, जे सुरू आहे ते बंद करण्यात हे सरकार पटाईत आहे, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी खोचक टीका केली. हेही वाचा.. 'गाणं म्हणणे आणि विधानं करणे, यात रश्मी ठाकरे कधी पडल्या नाही' हाथरस प्रकरणी कंठ फुटला होता... हाथरस प्रकरणी राज्य सरकारमधील मंत्र्यांना कंठ फूटला होता. मग आता पारोळा (जि.जळगाव) येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची विष पाजून नराधमांनी हत्या केली. आता सत्ताधारी गप्प का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊतांनाही फटकारलं.. नितीशकुमार यांनी बिहारमध्ये महाराष्ट्रातील पॅटर्न राबवावा, असा सल्ला देणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही चंद्रकांत पाटील यांना चांगलंच फटकारलं. सल्ला द्यायला संजय राऊत यांना आता दिल्लीत पाठवायला हवं. खरं तर अमेरिकेतही त्यांची गरज होती, अशा शब्दांत चंद्रकांतदादा यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. काय म्हणाले होते जयंत पाटील? दरम्यान, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जयंत पाटील यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली होती. महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना राज्यातील भाजप नेत्यांकडून सरकारच्या स्थिरतेबद्दल नेहमी वक्तव्ये केली जातात. पण आमचं सरकार 5 वर्षे टिकणार, तुम्ही स्वप्नच बघत बसा, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता. हेही वाचा..अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार, सरकारकडून मिळणार भाऊबीजेची भेट जयंत पाटील यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील चंद्रकांत पाटील यांनी सरकारबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. सरकार स्थापन झाल्यापासून चंद्रकांत पाटील हे राज्य सरकार पडेल, असं बोलत आहेत. दोन महिन्यांत पडेल, असंही ते म्हणाले होते. मात्र, एक वर्ष पूर्ण झालं आहे. हे सरकार 4 वर्षे पूर्ण करेल,' चंद्रकांत पाटील यांनी आता स्वप्नच पाहावं,' असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Chandrakant patil, Jayant patil, Maharashtra, Pune

पुढील बातम्या